शहाद्याच्या अलका कुलकर्णींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:52 PM2020-02-22T12:52:38+5:302020-02-22T12:52:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना डॉ.पी.व्ही. सोहोनी फाऊंडेशनचा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोंडाईचा ...

Alka Kulkarni of martyrdom conferred a performance award | शहाद्याच्या अलका कुलकर्णींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान

शहाद्याच्या अलका कुलकर्णींना कार्यगौरव पुरस्कार प्रदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना डॉ.पी.व्ही. सोहोनी फाऊंडेशनचा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दोंडाईचा येथील स्वातंत्र्य सेनानी डॉ.पी.व्ही. सोहोनी जन्मशताब्दीनिमित्त शहादा येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.अलका कुलकर्णी यांना कार्यगौरव पुरस्कार तर पुणे येथील डॉ.अभिजित सोनवणे यांना श्रमसाफल्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या आठ वर्षापासून दोंडाईचा येथील डॉ.पी.व्ही. सोहनी फाऊंडेशनतर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व व्याक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ.अलका कुलकर्णी व डॉ.अभिजित सोनवणे यांना प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ.मुकुंद सोहनी, डॉ.अनिल सोहनी, अनुराधा सोहनी, नगराध्यक्षा नयनकुवर रावल, सरकारसाहेब रावल, डॉ.रवींद्र टोणगावकर, हैदरअली नुरानी, डॉ.शशांक कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी हैदरअली नुरानी व हुकुमचंद कुचेरिया यांच्या हस्ते ‘हृदयाचे आरोग्य’ या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

Web Title: Alka Kulkarni of martyrdom conferred a performance award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.