स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:46 PM2020-05-30T12:46:08+5:302020-05-30T12:46:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील १८ स्वस्त धान्य दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रेशनमधील अनागोंदी व अनियमिततेच्या ...

Action will be taken against cheap food shops | स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई होणार

स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई होणार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील १८ स्वस्त धान्य दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रेशनमधील अनागोंदी व अनियमिततेच्या भाजपच्या तक्रारीवर प्रशासनाने संबंधीतावर कारवाई करावी या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाच्या उत्तरदाखल हे लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले.
नवापूर तालुक्यातील स्वस्त धान्य वाटप व्यवस्था सुरळीत नसल्याची तक्रार भाजप पदाधिकाऱ्यांनी १८ मे २०२० रोजी निवेदनातून केली होती. प्रशासनाकडून त्यावर आजतागात कार्यवाही झाली नाही व विभागाकडून लेखी खुलासाही देण्यात आला नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार धान्य वितरण व्यवस्था सुरळीत होऊन तक्रार झालेल्या दुकानदारांवर कार्यवाही करुन त्यांचे दुकान रद्द करण्याच्या मागणीसाठी नवापूर भाजपातर्फे तहसीलदार कार्यालयाजवळ शुक्रवारी उपोषण सुरु करण्यात आले. जि.प.चे माजी अध्यक्ष व भाजपा नेते भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत, जिल्हा चिटणीस एजाज शेख, नगरसेवक महेंद्र दुसाने, शहराध्यक्ष प्रणव सोनार, जयंती अग्रवाल, जाकीर पठाण, माजी नगरसेवक रमेशचंद्र राणा, हेमंत जाधव, समीर दलाल, जितेंद्र अहिरे, दिनेश चौधरी, सफू मिस्त्री, भिमसिंग पाडवी, भाविन राणा व कार्यकर्त्यांनी सनदशीर मार्गाने सोशल डिस्टन्स राखून उपोषण सुरू केले होते. दुपारी दोन वाजता तहसीलदार सुनीता जºहाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करुन १८ स्वस्त धान्य दुकानदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आपले उपोषण मागे घेतले. यासह आॅनलाईन डाटा एन्ट्रीची कामे एक महिन्याचा आत पूर्ण करण्यात येईल, असेही आश्वासन तहसीलदारांनी दिले. शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेप्रसंगी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत व संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाकडून तक्रार झालेल्या १८ दुकानांबाबत चौकशी करुन त्याचा अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आला होता. जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून त्यातील १२ दुकानांबाबत कारवाई करण्यात आली. कारवाईत काहींचे परवाने निलंबीत करण्यात आले. काहींची अनामत रक्कम १०० टक्के जप्त करुन दंड करण्यात आला तर काहींचे परवाने रद्द करण्यात आले. नगारे, बिजादेवी, अंठीपाडा, मोठे कडवान, देवलीपाडा, देवमोगरा, वागदी, घोगळपाडा व महिला बचत गट संचलित नवापूर शहरातील एका दुकानाचा त्यात समावेश आहे.


 

Web Title: Action will be taken against cheap food shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.