सोशल मिडियातून एप्रिल फूल केल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:28 PM2020-04-01T12:28:40+5:302020-04-01T12:28:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना आजारासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे खोटे संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, ...

Action on April Fool's social media action | सोशल मिडियातून एप्रिल फूल केल्यास कारवाई

सोशल मिडियातून एप्रिल फूल केल्यास कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना आजारासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे खोटे संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी दिला आहे. १ एप्रिल रोजी एप्रिल फूल करण्याच्या नादात अनेकांकडून अफवांचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़
एप्रिल महिन्याच्या प्रारंभी अनेक नागरिक मित्र परिवार किंवा नातेवाईकांना एप्रिल फुल करत असतात. त्यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मात्र करोना विषाणूसंदर्भात संभ्रम निर्माण करणारे संदेश नागरिकांनी पाठवू नये. आपत्तीच्या परिस्थितीत अशा संदेशामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची आणि संचारबंदीचे उल्लंघन होऊन प्रशासनावर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकात संभ्रम निर्माण करणारे खोटे संदेश प्रसारित करणारी व्यक्ती व गु्रप अ‍ॅडमिनवर मुंबई पोलीस कायदा कलमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कळवले आहे़ पोलीस अधिक्षकांच्या या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी हाणार असून सायबर सेल जिल्ह्यातील विविध समाज माध्यमांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे़

गावात फिरणे पडले महागात

सोशल मिडियावर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असतानाच मंगळवारी वाहतूक शाखेकडून शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली़ वाहनधारकांकडून ८० वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांनी दिली आहे़ शहरात संचारबंदी काळातही केवळ हौस म्हणून वाहने घेत भटकाणाºया टारगटांवर कारवाईचे सत्र सध्या पोलीस प्रशासनाने अवलंबले आहे़ यातून ८० वाहने जप्त करण्यात आली आहे़ येत्या काळातही वाहनधारक रस्त्यावर दिसून आल्यास कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शहरातील तब्बल आठ ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी नियुक्त करुन माहिती घेतली जात आहे़

Web Title: Action on April Fool's social media action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.