विना मास्क वावरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:19 PM2020-06-01T12:19:41+5:302020-06-01T12:19:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील विविध भागातील दुकानदारांनी विना मास्क व्यवसाय करणे, दुकानात ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न ...

Action against traders wearing masks | विना मास्क वावरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

विना मास्क वावरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील विविध भागातील दुकानदारांनी विना मास्क व्यवसाय करणे, दुकानात ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यासह इतर कारणांमुळे आठ व्यापाºयांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील विविध दुकानदार विना मास्क व्यवसाय करीत आहेत. स्वत: व येणाºया ग्राहकांना देखील ते धोक्याचे ठरत आहे. याशिवाय दुकानामध्ये पाच पेक्षा अधीक ग्राहक नको आणि त्यांच्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असतांना त्या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा दुकानदारांविरुद्ध थेट कारवाईचे सत्र सुरू केले.
गुन्हे दाखल करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये सिंधी कॉलनीतील सुमित पवनकुमार मंदाणा यांच्या कटलरी दुकानात, निझर रस्त्यावरील सुनील गोविंदराज जामनानी यांच्या किराणा दुकानात, त्याच भागातील प्रकाश गोपालदास सितपाल यांच्या साडीच्या दुकानात, सिंधी कॉलनीतील नितेश किशोर बख्त्यापूरी यांच्या जनरल स्टोअर्समध्ये, मिशन विद्यालयाजवळील गणेश बन्सीलाल रोकडे यांच्या एकविरा हॉटेलमध्ये, सिंधी कॉलनीतील सुमित अशोक सावनानी यांच्या कापड दुकानात, प्रवीण पुंडलीक मोरे यांच्या लक्ष्मी हॉटेलमध्ये, परशराम हिंदुजा यांच्या ईलेक्ट्रिकल दुकानात ही कारवाई करण्यात आली.
दुकानदारांनी स्वत: मास्क लावणे अनिवार्य आहे. शिवाय दुकानात येणाºया प्रत्येक ग्राहकाला मास्क लावल्याशिवाय दुकानात प्रवेश देवू नये. पाच पेक्षा अधीक जणांना दुकानात प्रवेश देवू नये. शिवाय आलेल्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सुचना दिल्या जाव्या असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Action against traders wearing masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.