शिथिलतेनंतर जिल्ह्यात परतले ६० हजार नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:44 PM2020-05-28T12:44:09+5:302020-05-28T12:44:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातून रोजगारासाठी परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या स्थलांतरीतांचा परतीचा प्रवास अद्यापही सुरु असून आजअखेरीस ६० ...

60,000 citizens returned to the district after relaxation | शिथिलतेनंतर जिल्ह्यात परतले ६० हजार नागरिक

शिथिलतेनंतर जिल्ह्यात परतले ६० हजार नागरिक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातून रोजगारासाठी परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या स्थलांतरीतांचा परतीचा प्रवास अद्यापही सुरु असून आजअखेरीस ६० हजार नागरिक सर्व सहा तालुक्यात परतले आहेत़ यात प्रामुख्याने ऊसतोड तसेच शेतीकामांसाठी गेलेल्या मजूरांची संख्या अधिक आहे़ या सर्वांना १४ दिवस होमक्वारंटाईन करण्यात आरोग्य विभागाने यश मिळवले आहे़
रोजगाराअभावी स्थलांतर हा प्रश्न जिल्ह्याला नवीन नाही़ दिवाळीनंतर आदिवासी बहुल भागातून मोठ्या संख्येने मजूर गुजरात राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे गेले होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर बहुतांश मजूर हे त्याच ठिकाणी अडकून पडले होते़ एप्रिल महिन्यात काही गोष्टीत शिथिलता मिळाल्यानंतर गुजरात राज्यातील कारखानदारांनी मजूरांना परत पाठवण्यास सुरुवात केली होती़ यातून जिल्ह्यात दर दिवशी किमान १ हजार पेक्षा अधिक मजूर परत होते़ या सर्वांची आरोग्य विभागाने तयार केलेल्या क्वारंटाईन सेंटरसह गावोगावी तपासणी बुथ तयार करुन तपासणी केली आहे़ यात प्रामुख्याने स्क्रिनिंग करुन त्यांना हातावर शिक्के मारुन होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांसह तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर तालुक्याच्या विविध भागात १४ दिवस क्वारंटाईन केलेल्या या मजूरांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासह मदतीने या सर्वांवर लक्ष ठेवून त्यांच्या नोंदी ठेवल्या होत्या़ यामुळे मोठ्या संख्येने मजूर येऊनही त्यांची माहिती मिळवणे सोपे झाले होते़
दुर्गम भागात एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून परतणारे बरेच मजूर स्वेच्छेने गावाबाहेरच थांबून होते़ हे मजूर १५ दिवस पूर्ण झाल्यानंतर गावांमधील आपआपल्या घरी परतले असल्याची माहिती आहे़

४परत आलेल्यात केवळ स्थलांतरीत मजूर नव्हे तर खाजगी नोकरी व व्यवसायानिमित्त महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये रहिवास करणाऱ्यांचाही समावेश आहे़
४आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात २१ हजार ३७५़
४नवापुर तालुक्यात ४ हजार ९२५़
४तळोदा तालुक्यात ८ हजार ९११़
४शहादा तालुका-७ हजार ३०३़
४अक्कलकुवा ८ हजार ८६३़
४तर धडगाव तालुक्यात ९ हजार ४८५ स्थलांतरीत नागरिकांनी प्रवेश केला होता़
४एकूण ६० हजार ८६२ संख्या असलेल्या या नागरिकांच्या क्वारंटाईन केंद्रांसह गावनिहाय स्क्रीनिंग करण्यात आले होते़
४अद्यापही परतणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यांची माहिती घेतली जात आहे़

४गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अडकलेल्या मजूरांना श्रमिक एक्सप्रेसने आणण्याचा प्रयत्नही जिल्ह्यात प्रथमच यशस्वी झाला़ यात एकाच वेळी दीड हजार मजूर आले होते़ या सर्वांच्या तपासण्या व स्क्रिनिंग केले गेले़
४जिल्ह्यात परतलेल्या एकाही मजूराला इन्स्टीट्यूशल क्वारंटाईन करण्याची वेळ आलेली नसल्याची माहिती आहे़
४गुजरात सीमेवर मध्यरात्री किंवा पहाटे मजूरांना सोडून देण्याचे प्रकार होत होते़ या मजूरांना तळोदा, नंदुरबार, नवापुर या सीमेवरील तालुक्यांच्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये आणून त्यांची तपासणी करुन त्यांच्या गावांकडे रवाना केले गेले़

जिल्ह्यात परत येणाºया मजूरांची तसेच नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे़ आरोग्य कर्मचाºयांना गावोगावी भेटी देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार त्यांनी भेटी देत पतणाºयांची माहिती घेऊन त्याचा आढावा सादर केल्यावर तपासण्या झाल्या आहेत़
-डॉ़ एऩडी़बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबाऱ

Web Title: 60,000 citizens returned to the district after relaxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.