प्रकाशा येथील भजन स्पर्धेत 30 मंडळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:44 PM2019-08-19T12:44:29+5:302019-08-19T12:44:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : विविध शहर ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे रविवारी येथील सद्गुरू धर्मशाळेत ‘संत तुकाराम ...

30 circles participate in hymn competition at Prakash | प्रकाशा येथील भजन स्पर्धेत 30 मंडळांचा सहभाग

प्रकाशा येथील भजन स्पर्धेत 30 मंडळांचा सहभाग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : विविध शहर ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळातर्फे रविवारी येथील सद्गुरू धर्मशाळेत ‘संत तुकाराम महाराज भजन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील 30 भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन भागवत कथाकार कृष्णानंद महाराज (हरिद्वार) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी  प.पू. जिज्ञासा दीदी, महेंद्र पटेल, मगन चौधरी, हरी पाटील, मोहन चौधरी, किशोर चौधरी,  भगवान पटेल उपस्थित होते. स्पर्धेत शहादा, मामाचे मोहिदे, सुजालपूर, बामखेडा, निझर, कहाटूळ, डामरखेडा, कोरीट, आडछी, चिंचोदा, फेस, लहान शहादे, वडछील, पुणे, गुजरभवाली, कोळदे, त:हाडी, पळाशी, प्रकाशा, मलोणी, अंकलेश्वर, विद्याविहार, दामळदा, चांदपुरी, सुरत, बोरद, लहान लोणखेडा येथील भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला.  या स्पर्धेत रास, अभंग, गवळण, भाव-भक्ती असे विविध गीते सादर करण्यात आली. स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळाला 12 मिनीटांचा वेळ देण्यात आला. काही भजनी मंडळांनी गरबा, रास, नृत्य सादर करून जीवंत देखावा सादर केला. काही मंडळातील कलावंतांनी एकाच रंगाचा ड्रेस, साडी घालून भजन सादर केले. यात बोरद येथील बासरीवादक कन्हैयालाल पटेल यांचे बासरीचे वादन मंत्रमुग्ध करणारे ठरले. परीक्षक म्हणून पंडितराव बोरसे (धुळे), वसंत नारद (कोपरगाव), राहुल खेडकर (नंदुरबार), रामकृष्ण मराठे (सुरत) यांनी काम पाहिले. प्रास्ताविक डॉ.प्रशांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन किरण चौधरी व हेमंत पाटील यांनी तर आभार प्रवीण पाटील व  डॉ.प्रफुल्ल पटेल यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल
स्पर्धेनंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. भजन स्पर्धेतील पुरूष गटात प्रथम सिध्देश्वर भजनी मंडळ कोरीट, ता.नंदुरबार, द्वितीय हरिओम भजनी मंडळ म्हसावद, ता.शहादा, तृतीय संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ मामाचे मोहिदे, ता.शहादा. महिला गटात प्रथम संत मिराबाई भजनी मंडळ विद्याविहार, ता.शहादा, द्वितीय सरस्वती भजनी मंडळ शहादा, तृतीय जय अंबे भजनी मंडळ लोणखेडा, ता.नंदुरबार. रास गायन स्पर्धेत प्रथम न्यू बामखेडा, ता.शहादा, द्वितीय बामखेडा, ता.शहादा तृतीय कहाटूळ, ता.शहादा. उत्कृष्ट गायक पुरूष गटात सागर प्रकाश पाटील (हरिओम भजनी मंडळ म्हसावद), उत्कृष्ट गायक महिला गटात   नीलिमा पाटील, हर्षा पाटील (सरस्वती भजनी मंडळ शहादा). उत्कृष्ट तबला वादक स्पर्धेत कृष्णकांत जगन चौधरी (प्रकाशा, ता.शहादा). उत्कृष्ट हार्मोनियम वादक स्पर्धेत अशोक चौधरी (न्यू बामखेडा, ता.शहादा) यांची निवड करण्यात आली.

याच कार्यक्रमात वृक्ष लागवडीसाठी विविध प्रजातीच्या 1200 रोपांचे वाटप करण्यात आले. त्यात राकेश पटेल (सोनगढ) यांनी 700 तर जगदीश पटेल (सुरत) यांनी 500 रोपे दिली.
या स्पर्धेसाठी आलेल्या भजनी मंडळातील कलावंत व उपस्थितांना चहा-नाश्त्याची व्यवस्था करजकुपा ग्रामस्थांनी तर भोजनाची व्यवस्था काहाटूळ ग्रामस्थांनी केली होती. भागवत साऊंडचे संचालक रवींद्र पटेल यांनी साऊंड सिस्टीमसह स्मृतीचिन्ह उपलब्ध करून दिले.
यंदा व्हीएसजीजीएम मंडळातर्फे यंदा झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी वरांना इंदूर गुजर समाज ग्रुपतर्फे हेल्मेटचेही या कार्यक्रम वाटप करण्यात आले.

Web Title: 30 circles participate in hymn competition at Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.