नुकसान भरपाईचे 1 कोटीचे अनुदान वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:17 AM2019-11-20T11:17:37+5:302019-11-20T11:17:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या सुमारे 11 हजार शेतक:यांना 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे ...

1 crore grant category for compensation | नुकसान भरपाईचे 1 कोटीचे अनुदान वर्ग

नुकसान भरपाईचे 1 कोटीचे अनुदान वर्ग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या सुमारे 11 हजार शेतक:यांना 1 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे पहिल्या टप्प्यातील अनुदान वर्ग करण्यात आले आह़े शासनाकडून मंगळवारी सायंकाळी उशिरा जिल्हा प्रशासनाला 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याचा संदेश मिळाला आह़े  
जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती़ यातून 5 हजार 818 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांचे पंचनामे कृषी आणि महसूल विभागाने केले होत़े या पंचनाम्यांचा अहवाल नुकसान जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आल्यानंतर 885 शेतक:यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडे 3 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती़ यानुसार मंगळवारी सायंकाळी मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शेतक:यांना पहिल्या टप्प्यातील 1 कोटी 13 लाख रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आह़े पुढील टप्प्यात 2 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े बुधवारपासून तालुकास्तरावर या मदत वाटपाची कारवाई सुरु करण्यात येणार आह़े त्यासाठी शेतक:यानी तलाठींकडे आवश्यक ती कागदपत्रे तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ 

अवकाळी पावसामुळे सहा तालुक्यात 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले होत़े 5 हजार 788 हेक्टर हे कोरडवाहू क्षेत्र आह़े 22 हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान झाले होत़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 98 लाख 20 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव देण्यात आला होता़ नंदुरबार तालुक्यात एकूण 55़57 हेक्टर, नवापुर 506, अक्कलकुवा 1 हजार 869, शहादा 1 हजार 576 तर धडगाव 1 हजार 757 तर तळोदा तालुक्यात 8 हेक्टर शेतीपिकांचे  नुकसान झाले होत़े 
 

Web Title: 1 crore grant category for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.