निष्काळजीपणा ! महामार्गावर पुलासाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:06 PM2020-12-26T12:06:37+5:302020-12-26T12:07:03+5:30

रस्त्यावर पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला.

A young man was killed by a pothole on the highway; Incidents in Nanded district | निष्काळजीपणा ! महामार्गावर पुलासाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

निष्काळजीपणा ! महामार्गावर पुलासाठी खोदलेल्या खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

Next
ठळक मुद्देआजपर्यंत 2 वर्षात अनेकांचे बळी या महामार्गाने घेतले आहेत.

नांदेड : राष्ट्रीय महामार्ग 222 हैद्राबाद ते निर्मलचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच रस्त्यावर पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या महामार्गावर काम सुरु असल्यापासून ठेकेदाराने कसल्याही प्रकारची सुरक्षा उपाययोजना, दिशादर्शक फलक लावले नाहीत. या निष्काळजीपणामुळे अनेकांचे प्राण गेले आहेत.

रस्त्याचे हे काम संथ गतीने सुरू आहे मालेगाव पोलीस चौकीच्याजवळ  काही अंतरावर पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम केलेले आहे. परंतू, या ठिकाणी कुठलेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही. सुरक्षिततेची कुठलीही उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. आजपर्यंत 2 वर्षात अनेकांचे बळी या महामार्गाने घेतले आहेत. महामार्गाचे काम संथ गतीने तसेच निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे अनेक आंदोलन झाली. 25 डिसेंबर रात्री किरण राठोड नावाचा युवक दुचाकीवरून जात असताना खड्यात पडला. गंभीर जखमी युवकाचा जागीच मृत्यू झाला

Web Title: A young man was killed by a pothole on the highway; Incidents in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.