द्वेषभावनेचा त्याग केला तर मैत्रीभावना वाढीस लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:34+5:302021-03-01T04:20:34+5:30

खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या वतीने निघालेल्या भिक्खूंच्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे लोहा तालुक्यातील कोल्हे बोरगाव, ...

When hatred is forsaken, friendship grows | द्वेषभावनेचा त्याग केला तर मैत्रीभावना वाढीस लागते

द्वेषभावनेचा त्याग केला तर मैत्रीभावना वाढीस लागते

Next

खुरगाव नांदुसा येथील श्रामणेर प्रशिक्षण व विपश्यना केंद्राच्या वतीने निघालेल्या भिक्खूंच्या धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे लोहा तालुक्यातील कोल्हे बोरगाव, जवळा देशमुख, खडकमांजरी या ठिकाणी आगमन झाले. खडकमांजरी येथे झालेल्या कार्यक्रमात पंय्याबोधी बोलत होते. ते म्हणाले की, मानवाला अनेक प्रकारची आसक्ती असते. त्यामुळे दुःखनिर्मिती होते. दु:खमुक्तीसाठी आसक्तीचा त्याग केला पाहिजे. तृष्णेवर मात करणे हेच बुद्धाचे तत्त्वज्ञान आहे. यावेळी भंते संघरत्न यांचीही धम्मदेसना पार पडली.

धम्ममित्र अनुरत्न वाघमारे व गंगाधर ढवळे यांनी याचना केल्यानंतर पंय्याबोधी थेरो यांनी उपस्थित उपासक - उपासिकांना त्रिसरण पंचशिल दिले. त्यानंतर धम्मदेसना झाली. यावेळी भंते संघरत्न, भंते धम्मकीर्ती, भंते श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सदानंद यांच्यासह नवदीक्षित श्रामणेर भिक्खू संघ, अनुरत्न वाघमारे, धम्मदान व धम्मसंदेश यात्रेचे संकल्पक गंगाधर ढवळे, सरपंच चांदोजी कापसे, उपसरपंच गणपत वाघमारे, ग्रा.पं. सदस्य आनंदराव एडके, सुकेशिनी वाघमारे, पोलीस पाटील गौतम वाघमारे, चांदू एडके, विश्वनाथ कांबळे, धम्मचळवळीचे देविदास एडके, श्यामसुंदर वाघमारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. सूत्रसंचालन देविदास एडके यांनी केले. आभार आत्माराम गायकवाड यांनी मानले. यावेळी आर्थिक दान व सर्व प्रकारच्या धान्याचे दान करून उपासकांनी दान पारमिता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोती वाघमारे, संतोष वाघमारे, दशरथ एडके, परमेश्वर वाघमारे, मारोतराव जोंधळे, गंगाधर जोंधळे, भीमराव वाघमारे, हरी एडके, लिंबाजी गायकवाड, किशन वाघमारे, नारायण वाघमारे, किशन मेकाले, मारोती हंकारे, निवृत्ती वाघमारे यांच्यासह तथागत मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: When hatred is forsaken, friendship grows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.