'माझ्याकडे काय बघतोस', म्हणून चाकूचे वार; कुख्यात आरोपीकडून भर दिवसा एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:11 PM2020-08-07T15:11:24+5:302020-08-07T15:33:11+5:30

माझ्याकडे काय पाहतोस, अशी विचारणा करीत आरोपीने वाद घातला

‘What do you look at me for’, hence the stabbing of the knife; One murdered in Nanded | 'माझ्याकडे काय बघतोस', म्हणून चाकूचे वार; कुख्यात आरोपीकडून भर दिवसा एकाचा खून

q

Next
ठळक मुद्देआरोपीने महंमद सरवरला भर चौकात भोसकले़आरोपीवर वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत

नांदेड : नयुमखान अयुबखान ऊर्फ मड्डीदादा याने माझ्याकडे काय बघत आहेस, असे म्हणून  महंमद सरवर (४0) या  व्यक्तीचा भरदिवसा चाकूने भोसकून खून केला. ही घटना गुरुवारी नांदेड शहरातील खडकपुरा भागात दुपारी चारच्या सुमारास घडली़ या घटनेनंतर मारेकऱ्यास वजिराबाद पोलिसांनी अटक केली. 

शहरातील खडकपुरा येथील महंमद सरवर महंमद कैसर हा गुरूवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत चौकात बोलत थांबला होता़ त्यावेळी तेथून नयुमखान अयुबखान ऊर्फ मड्डीदादा हा तेथून आपल्या घरी जात होता़ दरम्यान, महंमद सरवर यांनी नयुमखानकडे पाहिले़ त्यावेळी माझ्याकडे काय पाहतोस, अशी विचारणा करीत नयुमखानने वाद घातला. या वादानंतर नयुमखानने आपल्या घरातून चाकू आणून महंमद सरवरला भर चौकात भोसकले़ घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ घटनास्थळावरून नयुमखानला पोलिसांनी अटक केली़ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ नयुमखान याच्यावर वजिराबाद पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ 

...तरीही आरोपी वार करीतच राहिला
 चाकूचे वार करताना नागरिकांनी का मारत आहेस, अशी विचारणा केली़ मात्र, नयुमखानची या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला अडवण्याचे कुणीही धाडस केले नाही़ तो वार करीतच राहिला़ जखमी अवस्थेतील महंमद सरवरने स्वत:ला वाचविण्यासाठी टाहो फोडला़ नागरिकांनी महंमद सरवरला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेत असतानाच तो मरण पावला़ या घटनेनंतर नयुमखान तिथेच थांबला़ 

Web Title: ‘What do you look at me for’, hence the stabbing of the knife; One murdered in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.