समान नावाचा फायदा घेऊन सातबारा नावाने केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 04:38 PM2020-01-22T16:38:05+5:302020-01-22T16:38:23+5:30

तीन भावंडावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

took same name advantage on Satbara record in Nanded | समान नावाचा फायदा घेऊन सातबारा नावाने केला

समान नावाचा फायदा घेऊन सातबारा नावाने केला

Next

धर्माबाद (जि़नांदेड) : समान नावाचा फायदा घेऊन, जमिनीशी कोणताच संबंध नसताना वडीलाचा वारसदार आहे असे भासवून खोटा फेर सातबारावर नावे लावल्याप्रकणी तीन भावंडांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल धर्माबाद पोलिस ठाण्यात झाला आहे.

तालुक्यातील जारिकोट येथील नागेश गंगाधर रामोड यांच्या वडिलांच्या गंगाधर गंगाराम या नावे  सायखेड शिवारात गंट नं.७९ व सर्वे न.२८ मध्ये ६५ आर जमीन आहे. ही जमीन नागेश रामोड यांच्या ताब्यात आताही आहे पण जमीन ताब्यात असल्यामुळे बरेच वर्षांपासून सातबारा नावाने काढला नाही की बघीतले नाही. या संधींचा फायदा घेऊन गंगाधर गंगाराम हे नाव आमच्या वडीलाचे आहे असे भासवून पोशष्टी गंगाधर आरसेवाड, माधव गंगाधर आरसेवाड, लक्ष्मण गंगाधर आरसेवाड या तीन भावंडांनी सातबारावर नाव चढवून घेतले. ही माहिती लक्षात येतात सर्वे पुरावे गोळा करून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात दोषारोप तपासणी केल्यानंतर नागेश रामोड यांच्या वडीलांच्या नावे जमीन आहे असे निष्पन्न झाले. त्यावरुन वरिल तीन जन फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्माबाद पोलिस स्टेशनला दिले, त्याअनुषंगाने धर्माबाद पोलिस ठाण्यात तीन भावंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Web Title: took same name advantage on Satbara record in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.