नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:03 PM2020-01-14T19:03:32+5:302020-01-14T19:05:44+5:30

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे़

Three-day Hottal festival from Friday in Nanded | नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव

नांदेडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय होट्टल महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे़

नांदेड : होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाद्वारे जिल्हावासियांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले़.

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे़ तत्पूर्वी ४.३० ते ५ या वेळेत ऐश्वर्य परदेशी व भार्गव देशमुख यांच्या गायन व तबलावादनाचा कार्यक्रम होणार आहे़ उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ७ ते १० या वेळेत सिनेतारका तसेच प्रसिद्ध नृत्यांगणा शर्वरी जमेनीस यांच्या संचाचा अमृतगाथा हा कथ्यक नृत्यावर आधारित कार्यक्रम होणार आहे़ शनिवारी दुपारी १२ ते २ या वेळेत डॉ़ प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा़ चंद्रकांत पोतदार, डॉ़ रंजन गर्गे यांचे ‘चालुक्य स्थापत्य कला’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे़ सायंकाळी ६ ते ७ या वेळेत उद्धवबापू आपेगावकर व ऐनौद्दीन वारसी यांच्या संचात पखवाजवादन व बासरीवादन जुगलबंदी रंगणार आहे़ सायंकाळी ७ ते १० या वेळेत नवी मुंबई येथील नृत्यांगणा ऐश्वर्य बडदे व संचाचा लोककला लावणी नृत्याविष्कार होणार आहे़

रविवारी सायंकाळी ५ वाजता पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे़ त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत गायक संजय जोशी व संचातर्फे ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे़ रात्री ८ ते ९ या वेळेत विजय जोशी यांचे लोकसंगीत तर रात्री ९ ते १० यावेळेत औरंगाबाद येथील निरंजन भाकरे व संचाकडून भारुडाचे सादरीकरण केले जाणार आहे़ या सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवासाठी खा़ प्रताप पाटील चिखलीकर, आ़अमर राजूरकर, आ़राम पाटील रातोळीकर व तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांचा स्थानिक विकासनिधी मिळाला असल्याचेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले़

Web Title: Three-day Hottal festival from Friday in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.