नांदेड जिल्ह्यात शाळेचे दरवाजे बंदच; पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 06:18 PM2020-11-27T18:18:24+5:302020-11-27T18:20:31+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक निर्णयाला महत्व दिले आहे.

School doors closed in Nanded district; Beginning with consent from parents | नांदेड जिल्ह्यात शाळेचे दरवाजे बंदच; पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात

नांदेड जिल्ह्यात शाळेचे दरवाजे बंदच; पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात

Next
ठळक मुद्दे शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आहे जिल्ह्यातील एकाही गावातील शाळा सुरू झाली नाही.

नांदेड : राज्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर अनेक जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्वाचा असल्याने नांदेड  जिल्ह्यातील एकही शाळा अद्याप सुरू करण्यात आली नाही. असे असले तरी शिक्षकांची मात्र ५० टक्के   उपस्थिती आहे. 

कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक निर्णयाला महत्व दिले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतची एकही शाळा अद्याप सुरू झाली नाही. १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली असल्याने सध्या शिक्षण विभागाकडून पालकांकडून संमतीपत्र भरून घेण्यात येत आहे. दरम्यान, दिवाळीनंतर कोरोना रूग्णांची आकडे वाढत असल्याने पालकांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे. आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास अनेक पालकांनी नकार दर्शविला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून दोन वेळेस प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कोरोना महामारी आटोक्यात येत नसल्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येत होतो.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची आकडेवारी घसरली होती. दिवाळीनंतर मात्र रूग्णांची आकडेवारीचा आलेख चढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी
 काही शिक्षकांना कोरोनाच संसर्ग झाल्याचे पुढे आले होते. तर काही शिक्षकांचे रिपोर्ट उशीरा प्राप्त होत होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शाळेतील ५० टक्के  शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत थांबावे लागत आहे.

पालकांकडून संमतीपत्र
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. आता १ डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याची शक्यता असून त्यासाठी पालकांकडून संमतीपत्र घेतले जात आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील एकाही गावातील शाळा सुरू झाली नाही.  शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात  तयारी केली होती. शिक्षकांची कोविड १९ टेस्ट करण्यात  येत आहे. मात्र स्थानिक पातळीवर शाळा सुरू न करण्यासंदर्भात निर्णय झाला असून १ डिसेंबरनंतर शाळा सुरू होतील. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड
 

Web Title: School doors closed in Nanded district; Beginning with consent from parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.