दिलासादायक ! भोकरच्या 'त्या' १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 10:16 AM2020-04-20T10:16:31+5:302020-04-20T10:17:20+5:30

नांदेड जिल्ह्यातील आणखी ४८ अहवाल निगेटिव्ह

Reassuring! Bhokar's 18 people swab test negative | दिलासादायक ! भोकरच्या 'त्या' १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह

दिलासादायक ! भोकरच्या 'त्या' १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह

Next

नांदेड: : तेलंगणातील कोरोनाबाधित ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या भोकर येथील १८ जणांच्या घशाचा द्रव तपासणीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे.

यासोबतच शुक्रवारी नांदेडहून पाठवलेल्या एकूण ४८ जणांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याची माहिती मीडिया समन्वयक व उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत निगेटिव्ह आलेल्या अहवालाची संख्या ३६८ वर गेली असून जिल्हयात एकही व्यक्ती कोरोना बाधित नाही. म्हैसा रस्त्यावरील राहटी तपासणी नाक्यावर १६ एप्रिल रोजी तेलंगणा राज्यातील करीमनगर येथील आंब्याच्या ट्रकसोबत कोरोनाबाधीत चालक आला होता.

तपासणीदरम्यान पोलीस प्रशासनाचे आणि परिवहन विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी त्या कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्याने शनिवारी १८ जणांची नांदेड येथे तपासणी करून त्यांचा स्वँब औरंगाबाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. रविवारी रात्री उशिरा त्या १८ जणांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली.

दुसरा अहवाल आल्यानंतर सर्वांना घरी जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधीत ट्रकचालकाच्या संपर्कात आलेल्यांचा काय रिपोर्ट येईल याबाबत भोकरसह जिल्हयातील नागरीकांत चिंतेचे वातावरण होते. मात्र सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Reassuring! Bhokar's 18 people swab test negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.