ऑनलाईन ऑर्डर केलेला पिझ्झा आलाच नाही मात्र खात्यातून कटले ८८ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:08 PM2020-02-12T16:08:53+5:302020-02-12T16:11:00+5:30

. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. 

The pizza ordered online will not only arrive but the account will be deducted 88 thousand from the account | ऑनलाईन ऑर्डर केलेला पिझ्झा आलाच नाही मात्र खात्यातून कटले ८८ हजार

ऑनलाईन ऑर्डर केलेला पिझ्झा आलाच नाही मात्र खात्यातून कटले ८८ हजार

googlenewsNext
ठळक मुद्देएक लिंक पाठवून यूपीआय कोड अन खात्यासंदर्भात इतर माहिती मागवली

नांदेड- शहरातील भाग्यनगर भागातील एका कंत्राटदाराला पिझ्झाची ऑर्डर करणे चांगलेच महागात पडले असून 88 हजार 500 रुपये त्यांच्या खात्यातून लंपास करण्यात आले आहेत. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. 

सचिन पाटील या गुत्तेदाराने झोमॅटो अपवरुन पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यासाठी ऑनलाईन पैसे ही पाठवले होते. परंतु पिझ्झा आलाच नाही . त्यामुळे त्यांनी कस्टमर केअर ला फोन केला. कस्टमर केअरने त्यांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून यूपीआय कोड अन खात्यासंदर्भात इतर माहिती पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी माहिती पाठविल्यानंतर त्यांच्या खात्यातून 88 हजार 500 रुपये लंपास करण्यात आले. या बाबत माहिती मिळताच पाटील यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: The pizza ordered online will not only arrive but the account will be deducted 88 thousand from the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.