कोरोना प्रादुर्भावातही नांदेडकरांचा विमानप्रवास सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:54 PM2021-03-10T16:54:26+5:302021-03-10T16:55:40+5:30

नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली.

Nandedkar's flight was smooth even in the Corona outbreak | कोरोना प्रादुर्भावातही नांदेडकरांचा विमानप्रवास सुसाट

कोरोना प्रादुर्भावातही नांदेडकरांचा विमानप्रवास सुसाट

Next
ठळक मुद्देदेशांतर्गत प्रवासी संख्येत घटनांदेडमध्ये मात्र वाढ

- विशाल सोनटक्के

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षी राज्यातील देशांतर्गत विमान सेवा मोठ्या प्रमाणात खंडित झाली होती. त्यामुळेच राज्यातील हवाई प्रवासी संख्येतही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घट झाली आहे; मात्र त्यानंतरही शिर्डी, कोल्हापूरसह नांदेड येथील प्रवासी संख्या वाढली. नांदेडमध्ये २०१९ मध्ये १ लाख १८ हजार प्रवाशांनी हवाई सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये हीच संख्या १ लाख ३७ हजारांवर पोहोचली.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील वर्षी अनेक ठिकाणची देशांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळेच हवाई प्रवाशांच्या संख्येवर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये राज्यात १ कोटी ४६ लाख ३३ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान सेवेचा लाभ घेतला होता. २०२० मध्ये या प्रवासी संख्येत घट झाली असून, ती संख्या १ कोटी २५ लाखांवर आहे. मात्र अशा विपरित परिस्थितीतही नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्या वाढल्याचे सकारात्मक चित्र आहे.

नांदेड विमानतळावरून सध्या एअर इंडियाची नांदेड-अमृतसर, नांदेड-दिल्ली आणि नांदेड-चंदीगड ही प्रवासी सेवा सुरू आहे, तसेच नांदेड-हैद्राबाद व नांदेड-मुंबई अशी टू जेटच्या माध्यमातून दररोज सेवा आहे. नांदेड येथे सचखंड गुरुद्वारा असल्याने दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक नांदेडला येतात. तसेच हिंगोली, परभणी, यवतमाळ व लातूर या जिल्ह्यातील नागरिकही नांदेड येथूनच विमान प्रवासास पसंती देत असल्याने नांदेडमधील हवाई प्रवाशांची संख्येत भर पडली.

औरंगाबादेतील प्रवासी संख्येतही किंचित घट
२०१९ मध्ये शिर्डी विमानतळावरून २ लाख २९ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. यात २०२० मध्ये वाढ झाली असून, ५ लाख ६९ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. कोल्हापूरमध्येही २०१९ मध्ये १८ हजार प्रवाशांनी विमानसेवेला प्राधान्य दिले. यात वाढ होत २०२० मध्ये १ लाख ३१ हजारावर प्रवासी संख्या पोहोचली. नाशिक ओझर येथून २०१९ मध्ये ४४ हजार प्रवाशांनी उड्डाण घेतले होते. २०२० मध्ये ही संख्या १ लाख २ हजारांवर पोहोचली. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह औरंगाबादेतील देशांतर्गत प्रवासी संख्येत २०१९ च्या तुलनेत घट झाली. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला. २०२० मध्ये ही संख्या ३ लाख ४६ हजार झाली आहे.

Web Title: Nandedkar's flight was smooth even in the Corona outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.