नांदेड ड्रग्सचे नेटवर्क संपूर्ण मराठवाड्यात;'एनसीबी' राबविणार 'ऑपरेशन क्लीनअप'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 10:50 PM2021-11-24T22:50:52+5:302021-11-24T22:52:50+5:30

NCB Raids Nanded एमपीतून पुरवठादाराला अटक करण्यात आले आहे.

Nanded Drugs Network spreads across Marathwada; NCB to launch 'Operation Cleanup' | नांदेड ड्रग्सचे नेटवर्क संपूर्ण मराठवाड्यात;'एनसीबी' राबविणार 'ऑपरेशन क्लीनअप'

नांदेड ड्रग्सचे नेटवर्क संपूर्ण मराठवाड्यात;'एनसीबी' राबविणार 'ऑपरेशन क्लीनअप'

googlenewsNext

- सुनील जोशी

नांदेड - एनसीबीच्या पथकाने २३ नोव्हेंबर रोजी कामठा ता.नांदेड येथे छापा टाकून ड्रग्सची फॅक्ट्री उद्धवस्त (NCB Destroy Drugs Factory In Nanded) केली. पथकाने या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून तिघांनाही तीन दिवस एनसीबी कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, मध्यप्रदेशातून ड्रग्ससाठी लागणारा साठा जो व्यक्ती नांदेडला पाठवत होता, त्यालाही एनसीबीने अटक केली असून गुरुवारी नांदेडच्या न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. मात्र त्याचे नाव कळू शकले नाही.

सूत्रानुसार हरदयालसिंघ गुलाबसिंघ काटोडिया, जीवनसिंघ अवतारसिंघ चोपरा, जितेंदरसिंघ प्रग्यानसिंघ बुल्लर अशी आरोपींची नावे आहेत. यातील हरदयालसिंघ हा मुख्य आरोपी आहे. शहरापासून जवळच असलेल्या कामठा येथे २०१५ पासून ड्रग्स बनवणारी फॅक्ट्री सुरू होती. तीन दुकाने आणि फॅक्ट्रीतून हा व्यवहार अव्याहतपणे चालू होता. मध्यप्रदेशातून यासाठी लागणारे रॉ मटेरियल ट्रकच्या माध्यमातून नांदेडला पोहचायचे. नांदेड येथील फॅक्ट्रीमध्ये त्याची प्रक्रिया व्हायची. प्रक्रिया झालेले ड्रग्स, अफू हे २५ किलो वजनाच्या पिठाच्या पिशव्याद्वारे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात तसेच पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आदी राज्यात ते पाठविले जायचे. एवढा मोठा ड्रग्सचा कारभार सुरू असताना स्थानिक पोलिसांना याचे गंधही असू नये याबद्दल एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

रॉ मटेरियल पुरविणाऱ्याला अटक

या प्रकरणाचे कनेक्शन संपूर्ण मराठवाड्यात पसरले असून आम्ही या प्रकरणातील आणखी काही जणांना लवकरच गजाआड करून हे प्रकरण तडीस नेल्याशिवाय गप्प राहणार नाही. ऑपरेशन क्लीपअप ही मोहीम मराठवाड्यात राबविण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

एनसीबीची गोपनीय कारवाईए

नसीबीच्या पथकाने आठ दिवसापूर्वी नायगाव तालुक्यातील मांजरम येथे संशयास्पद ट्रक पकडला. ट्रकच्या तपासणीत सुमारे ११२७ किलो गांजा आढळला होता. गांजानंतर एनसीबीच्या पथकाने वरीलप्रमाणे केलेली दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे. कुठल्या न कुठल्या निमित्ताने नांदेड चर्चेत येत आहे. एनसीबीच्या पथकात सुधाकर शिंदे यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीने एनसीबीने आपली कारवाईची मोहीम एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवली आहे.

Web Title: Nanded Drugs Network spreads across Marathwada; NCB to launch 'Operation Cleanup'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.