In Nanded, 98 lacks two fraud cases ! | नांदेडात फसवणुकीच्या दोन घटनांत ९८ लाख ४१ हजारांना चुना !
नांदेडात फसवणुकीच्या दोन घटनांत ९८ लाख ४१ हजारांना चुना !

ठळक मुद्देआरोपींची जिवे मारण्याची धमकी दिली

नांदेड : नोकरी नांदेडमध्ये फसवणुकीच्या दोन घटनांमध्ये ९८ लाख ४१ हजारांना चुना लावण्याचे प्रकरण समोर आले. यात नोकरीला लावतो म्हणून झालेल्या फसवणुकीत न्यायालयाच्या आदेशाने भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला, तर दुसऱ्या घटनेत व्यापाऱ्याला फसविले.

शहरातील तरोडा खु. भागातील सिद्धीविनायकनगर येथील सुनंदा तुकाराम चिट्टे या महिलेस आरोपीने ८ मे २००९ ते १८ मे २०१८ या कालावधीत दोन्ही मुलांना आणि मेहुण्यास नोकरी लावतो म्हणून चिट्टे यांच्याकडून तब्बल ३२ लाख रुपये उकळले. ही रक्कम उकळूनही मुलांना व मेहुण्याला नोकरी लागली नाही. त्यामुळे चिट्टे यांनी आरोपितांना पैसे परत देण्याची मागणी केली. यावेळी पैसे परत मागायला आलात तर दोन्ही मुलांना आणि तुला खतम करतो असे म्हणून आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात चिट्टे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशावरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात भोकर येथील नवा मोंढा मार्केट येथील व्यापारी गोपाल राधेश्याम असावा यांच्याकडून गुजरातमधील गांधीधाम कच्छ येथील आरोपिंनी  २ आॅक्टोबर २०१७ ते १२ आॅक्टोबर २०१७ च्या दरम्यान तीळ पाठविण्यास सांगितले. सदर तिळाचे पैसे आरटीजीएसद्वारे दिले जातील, असे सांगण्यात आले. मात्र सदर तिळाचे पैसे २०१८ पर्यंत दिलेच नाही. आरोपिंनी पुन्हा एकदा गोपाल असावा यांना संपर्क साधून रोख दहा लाख रुपये घेऊन गेले. या प्रकरणात ५६ लाख ४१ हजार रुपयांचा माल आणि पुन्हा रोख दहा लाख घेऊन गेले. पैसे परत न आल्याने असावा यांनी ६६ लाख ४१ हजार ६४९ रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी भोकर ठाण्यात तक्रार दिली. यावरून गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शेतकऱ्यास  तीन लाखांना फसवले
आंबेसांगवी येथील शेतकरी गणेश संभाजी कोंडेकर यांच्याकडील ४१ क्विंटल सोयाबीन १२ एप्रिल २०१९ रोजी आंबेसांगवी येथीलच एका व्यापाऱ्याने खरेदी केले. सदर सोयाबीनचे ३ लाख ५ हजार १२० रुपये चेकद्वारे घेण्यास सांगितले. मात्र, सदर चेक शेतकऱ्याला दिलाच नाही. अखेर शेतकरी गणेश कोंडेकर यांनी सोनखेड ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक मुंडे करीत आहेत.


Web Title: In Nanded, 98 lacks two fraud cases !
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.