बेरोजगार अभियंत्यांना काम वाटपासाठी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:11+5:302021-05-17T04:16:11+5:30

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती ठिकठिकाणी घरातच साध्या पद्धतीने साजरी ...

Meeting for allotment of work to unemployed engineers | बेरोजगार अभियंत्यांना काम वाटपासाठी बैठक

बेरोजगार अभियंत्यांना काम वाटपासाठी बैठक

Next

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांची जयंती ठिकठिकाणी घरातच साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

शेतकऱ्यांनी सतर्क राहावे

नांदेड : खरीप हंगामात इतर राज्यातून अनधिकृत एचबीटी कापूस बियाणे येण्याची शक्यता आहे. या बियाण्याला राज्यात विक्रीची परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अनधिकृत बियाणांची लागवड करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत बियाणे बाळगल्यास कापूस संरक्षण अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमच्या तरतुदीनुसार ५ वर्षांपर्यंत कारावास व एक लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे एचटीबीटी बियाणांची खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

लसीकरण सुरू करावे

नांदेड : सिडको कार्यालयांतर्गत मातृसेवा आरोग्य केंद्र येथे लसीकरण गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक यांच्यासह इतर नागरिक रोज लसीकरणासाठी विचारपूस करत आहेत. या केंद्रावर तत्काळ लसीकरण सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे साहेबराव मामीलवाड, प्रमोद मैड, विष्णू कदम यानी निवेदनाद्वारे केली आहे.

तुप्पा येथे सोयाबीन बियाणे उगवण शक्ती प्रात्यक्षिक

नांदेड : तुप्पा येथे कृषी विभागातील कृषी सहायक ए.एम. कास्टेवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करून दाखविण्यात आले. खरीप हंगाम २०२१ पूर्व नियोजनाच्या अनुषंगाने सोयाबीन बियाणांच्या बाजारातील संभाव्य तुटवडा लक्षात घेता, घरगुती सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

उगवन क्षमता तपासणी प्रात्याक्षिकासाठी ओल्या गोणपाटाचा वापर करून १०० बिया रुजविण्यात आल्या. बियाण्याची उगवनक्षमता ७० टक्के व त्यापेक्षा जास्त असेल, तर बियाणे पेरणीसाठी योग्य आहे. अपवादात्मक परिस्थितीत ६० टक्क्यांपर्यंत उगवन क्षमता असलेले बियाणे ही त्याच प्रमाणात मात्रा वाढवून पेरता येऊ शकते, तसेच पेरणीपूर्वी रसायनिक व जैविक औषधांची बीजप्रक्रिया करणे व जमिनीची सुपिकता निर्देशांक व शिफारशीनुसार द्यायची खताची मात्रा व वेळ याबद्दल माहिती देण्यात आली. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ (रुंद सरी वरंबा)सारख्या नवीन पेरणी पद्धतीचा अवलंब करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाचे कृषी सहायक ए.एम. कास्टेवाड यांनी केले. यावेळी सरपंच मंदाकिनी यन्नावार, उपसरपंच पार्वतीबाई कदम, संतोष कदम, किशोर कदम, गंगाधर कदम आदी शेतकरी उपस्थिती होते.

Web Title: Meeting for allotment of work to unemployed engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.