नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:48 PM2019-07-25T18:48:02+5:302019-07-25T18:48:53+5:30

जिल्ह्यातील साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी भरला विमा

Insurance for unloading of crops on one and half lakh hectares in Nanded district | नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा

नांदेड जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविला विमा

Next

- श्रीनिवास भोसले

नांदेड :  प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील जवळपास साडेनऊ लाख शेतकऱ्यांनी ४ लाख ६२ हजार ११८ शेतकऱ्यांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे़ तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत वाढविली असून २९ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार आहे़ 

प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील जवळपास ९ लाख ५९ हजार १०६ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमाहप्त्यापोटी ३८ कोटी ९२ लाख १८ हजार ३०७ रूपये भरले आहेत़ गतवर्षी जवळपास ११ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता़ पीकविमा भरण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या त्रुटी आणि बँकानी पीकविमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेवून शासनाच्या वतीने मुदत वाढवून दिली आहे़ त्यानुसार २९ जुलैपर्यंत विविध सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार आदीच्या माध्यमातून पीकविमा भरता येत आहे़ 

नांदेडसह मराठवाड्यात यंदा पावसाने पाठ फिरविली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचे मोठे सावट असून प्ोरलेलं अद्यापपर्यंत उगवलेलं नाही़ बहुतांश ठिकाणी उशिरा पेरण्या झाल्या़ आजपर्यंत लाखो हेक्टर जमीन पेरणीविना असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे़ अशा बहुतांश शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरला आहे़ नांदेड जिल्ह्यातील ९ लाख ५९ हजार १०६ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा भरला आहे़ त्यापैकी ५ हजार ३५१ शेतकरी कर्जदार असून त्यांचा पीकविमा बँकेमार्फत भरण्यात आला आहे़ तसेच ९ लाख ५३ हजार ३१० शेतकऱ्यांनी सीएससीमार्फत तर उर्वरित २९२ शेतकऱ्यांनी स्वत: पीकविमा भरला आहे़पीकविम्यापोटी ३८ कोटी ९२ लाख १८ हजार ३०७ रूपये रक्कम शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे भरली आहे़ 

नांदेड जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख हेक्टरवरील विविध पिकांचा १७६५ कोटी रूपयांचा विमा उतरविला आहे़ सद्य:स्थितीत पावसाने दिलेली उघडीप आणि उत्पन्नात होणारी घट लक्षात घेऊन पीकविमा भरण्याचे प्रमाण वाढले आहे़ गतवर्षी शासनाकडून वारंवार मुदतवाढ दिल्याने १० लाख ९१ हजार २८४ शेतकऱ्यांनी पिकविमा भरला होता़ त्यानुसार शेतकऱ्यांना यंदा १८़६१ कोटी रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे़ 

मागील पाच वर्षांत २०१७-१८ मध्ये मिळाली सर्वाधिक नुकसान भरपाई. २०१८-१९ मध्ये सर्वाधिक १० लाख ९१ हजार २८४ शेतकऱ्यांनी ४८़२२ कोटी रूपये विमा हप्ता भरला होता़ मात्र, कुठल्याही प्रकारचे नुकसान अथवा नैसर्गिक आपत्ती आली नसल्याचे कारण देत केवळ १८़६१ कोटी रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आले़ ४पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०१४ पासून वाढली असून त्यात दरवर्षी वाढ होत आहे़२०१४-१५ मध्ये १ लाख ३९ हजार २७ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता़ संबंधित शेतकऱ्यांना ७४़४४ कोटी रूपये नुकसान भरपाई मिळाली होती़ २०१५-१६ मध्ये ४ लाख ७२ हजार ६१७ शेतकऱ्यांनी पीकविमा हप्त्यापोटी १७़२४ कोटी रूपये भरले होते़ यावेळी संबंधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून २४५़५२ कोटी रूपये मिळाले होते़ २०१६ -१७ मध्ये ७ लाख ६१ हजार ५५४ शेतकऱ्यांनी ३०़४८ कोटी रूपये विमा हप्ता रक्कम भरली होती़ त्यांना ५०६़४९ कोटी रूपये नुकसान भरपाई मिळाली. २०१७ - १८ मध्ये १० लाख ४० हजार ६१७ शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी ३६़१४ कोटी रूपये भरले होते़ त्यांना नुकसान भरपाई म्हणून ५४२़७५ कोटी रूपये मिळाले होते.

Web Title: Insurance for unloading of crops on one and half lakh hectares in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.