विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार प्रकरण : फरार आरोपींच्या अटकेसाठी बिलोलीकरांचे शाळेत जोडेमारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:49 PM2020-01-20T14:49:52+5:302020-01-20T15:13:14+5:30

बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथिल घटना

'Immediately arrest absconding accused'; Bilolikar agitation in student sexual assault case | विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार प्रकरण : फरार आरोपींच्या अटकेसाठी बिलोलीकरांचे शाळेत जोडेमारो आंदोलन

विद्यार्थींनी लैंगिक अत्याचार प्रकरण : फरार आरोपींच्या अटकेसाठी बिलोलीकरांचे शाळेत जोडेमारो आंदोलन

Next
ठळक मुद्दे २० जानेवारीला शाळाच भरली नाहीशाळेचे प्रवेशद्वार तोडुन शाळेच्या प्रांगणात आंदोलन

बिलोली : तालुक्यातील शंकरनगर नगर येथील श्री. साईबाबा माध्यमिक विद्यालयातील दोन शिक्षकांनी सातव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील पाच आरोपी हे अद्याप फरार असल्याने त्यांच्या अटकेची मागणी करत नागरिकांनी शाळेच्या प्रांगणात सोमवारी सकाळी आंदोलन केले.

सातवीच्या विद्यार्थिनीवर शिक्षकांनी केला शाळेतच अत्याचार

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री.साईबाबा माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक रसुल सय्यद व दयानंद राजुळे यांनी सातवीतील मुलीस अश्लील व्हिडीओ दाखवून अत्याचार केले. तसेच या प्रकरणाची कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देऊन ही बाब कोणास न सांगण्याचे शपथपत्र अल्पवयीन मुलीच्या आईकरून लिहून घेतले. या प्रकरणी आरोपी दोन शिक्षक रसुल सय्यद व दयानंद राजुळे तसेच घटना दडपण्याचा प्रयत्न करणारे प्राचार्य शेळके, मुख्याध्यापक  प्रदिप पाटील, सुरेखाबाई बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र तीन दिवसांपासून आरोपी फरार आहेत. यामुळे आरोपींच्या अटकेची मागणी करत नागरिकांनी सोमवारी सकाळी शाळेच्या प्रांगणात आंदोलन केले. 

आरोपींच्या फोटोला चप्पलांचा हार घातला 
दरम्यान, ही शाळा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या संस्थेची असून आज शाळा उघडण्यात आली नव्हती. आरोपींच्या शोधात पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहे. मात्र आरोपींना अटक करण्यात अपयश येत असल्याने तालुकावासीयांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. सोमवारी आंदोलकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला आरोपींची फोटो टांगून त्याला चप्पलच्या माळा घातल्या. तसेच महिलांनी फोटोवर चप्पल -बुटांनी फटके मारले. तसेच प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत शाळेच्या प्रांगणात आरोपींच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी केली.

Web Title: 'Immediately arrest absconding accused'; Bilolikar agitation in student sexual assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.