ग्रामपंचायत सदस्या व मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:21 PM2020-09-28T17:21:07+5:302020-09-28T17:21:50+5:30

जिरोणा येथील महिला ग्रामपंचायत सदस्या व त्यांच्या मुलीचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली. ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूपवाड (३७ वर्षे) व कविता साहेबराव चुनूपवाड (१७ वर्षे) या दोघी मायलेकी दि. २७ रोजी सकाळी जनावरे घेऊन कामासाठी शेतावर गेल्या होत्या.

Gram Panchayat member and girl drowned in a well | ग्रामपंचायत सदस्या व मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू

ग्रामपंचायत सदस्या व मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू

googlenewsNext

उमरी : जिरोणा येथील महिला ग्रामपंचायत सदस्या व त्यांच्या मुलीचा शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली.

ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूपवाड (३७ वर्षे) व कविता साहेबराव चुनूपवाड (१७ वर्षे) या दोघी मायलेकी दि. २७ रोजी सकाळी जनावरे घेऊन कामासाठी शेतावर गेल्या होत्या. यावेळी त्यांची जनावरे चरत- चरत विहिरीजवळ गेली. सध्या पावसाच्या पाण्याने विहीर तुडुंब भरल्यामुळे जनावरे विहिरीत पडण्याच्या भितीने मुलगी कविता जनावरे बाजूला हाकलून लावण्यासाठी विहीरीजवळ गेली असता अचानक तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. आवाज आल्याने मुलीला वाचवण्यासाठी सुनंदा या विहिरीच्या काठावर जाऊन मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना त्या सुद्धा विहिरीत पडल्या.

दुपारी दोनच्या सुमारास प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले आणि सदर घटना उघडकीस आली. याप्रकरणी नातेवाईकांचा काहीच आक्षेप नसल्याने उमरी पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली नाही. सुनंदा चुनूकवाड यांचे पती साहेबराव चुनुकवाड हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत .

Web Title: Gram Panchayat member and girl drowned in a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.