जिल्ह्यात आजपासून प्रतिदिन साडेपाच हजार कोरोना चाचण्या होणार- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:19 AM2021-07-27T04:19:26+5:302021-07-27T04:19:26+5:30

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात ...

Five and a half thousand corona tests will be conducted in the district every day from today- Collector | जिल्ह्यात आजपासून प्रतिदिन साडेपाच हजार कोरोना चाचण्या होणार- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात आजपासून प्रतिदिन साडेपाच हजार कोरोना चाचण्या होणार- जिल्हाधिकारी

Next

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ज्या शासकीय कार्यालयाचा आणि सेवा वर्गात मोडणाऱ्या ज्या व्यावसायिकांचा अधिकाधिक विविध लोकांशी दररोज संपर्क येतो अशा व्यक्तींची सोळा वर्गवारीत विभागणी केली आहे. यात पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, ग्रामीण आरोग्य उपकेंद्र – अंगणवाडी पासून ते वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत गट केलेले आहेत. याचबरोबर बँका, कृषी विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, वीज वितरण, बस वाहतूक-डेपोपासून दूध विक्रेते, फळवाले, फेरीवाले, पेपरविक्रेते, रिक्षाचालक, खासगी वाहनचालक आदी सेवा क्षेत्राचा समावेश सुपर स्प्रेडरमध्ये केला आहे. सर्वाधिक काळजी याच घटकापासून घेणे अत्यावश्यक असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी युद्धपातळीवर करता यावी यादृष्टीने ही विशेष मोहीम हाती घेतली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.

ही मोहीम २७ जुलैपासून सुरु होत असून ती ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दररोज किमान ५ हजार ७००चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तहसील, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक विभागाला नेमून दिलेल्या तारखेप्रमाणे पथकामार्फत कोरोनाची तपासणी केली जाईल. यात आरटीपीसीआरचे प्रमाण जास्तीत जास्त राहणार आहे. नांदेड मनपा क्षेत्रासाठी दररोज २ हजार ३१० चाचण्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Web Title: Five and a half thousand corona tests will be conducted in the district every day from today- Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.