नरसीत बँकेमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:01+5:302021-05-19T04:18:01+5:30

वीजपुरवठा खंडित किनवट - तालुक्यातील सिंदगी मो. येथे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा व रात्रीही ...

Crowd at Narsit Bank | नरसीत बँकेमध्ये गर्दी

नरसीत बँकेमध्ये गर्दी

Next

वीजपुरवठा खंडित

किनवट - तालुक्यातील सिंदगी मो. येथे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा व रात्रीही वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता सबस्टेशनवरून बिघाड असल्याचे सांगण्यात आले. परंतु वीजपुरवठा सुरळीत करण्यात कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

इस्लापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

इस्लापूर - इस्लापूर भागात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू होता. रबी पिकांना या पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडून गेली. काही ठिकाणी वृक्षही उन्मळून पडले होते. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले.

सावरगावात डेंग्यूचे रुग्ण

मुखेड -तालुक्यातील सावरगाव पी. येथे डेंग्यूचे १८ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गावकरी चिंतेत आहेत. गावात धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे. याचवेळी डेंग्यूची परिस्थिती पाहण्यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तेथे पथक पाठवण्याची मागणी करण्यात येत आहे.

गोरठेकर मित्रमंडळाचा उपक्रम

उमरी - येथे रमजान ईदनिमित्त बापूसाहेब गोरठेकर मित्रमंडळाच्या वतीने ६०० मुस्लीम बांधवांना शिरर्खुमा कीटचे वाटप करण्यात आले. इस्लामपुरा, रापतवार नगर, जुनी उमरी, बाजार एरिया, म्हाडा कॉलनी आदी भागात हा उपक्रम राबवला. माजी नगराध्यक्ष प्रवीण सारडा, जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोरठेकर, सदानंद खांडरे, अनुसयाबाई कटकदवणे, रतन खंदारे, सय्यद फारुख, शेख ताजोद्दीन, बाबु बेग, एजाज खान, राजू सवई आदी उपस्थित होते.

ग्रामीण महाविद्यालयात ई-आंतरराष्ट्रीय परिषद

मुखेड - येथील ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथे भूगोल विभाग व आयक्युएसीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आंतरविद्या शाखीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत प्रा.लाल नेरवीन धर्मश्री (श्रीलंका), प्रा.डॉ.हाफीजा खातून (बांग्लादेश), महंमद ताहेर खान (पाकिस्तान), विनोदकुमार भारद्वाज, डॉ.राजेश अभय हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली.

भोकरफाटा येथे रक्तदान शिबीर

अर्धापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भोकर फाटा येथे १६ मेरोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ६३ दात्यांनी रक्तदान केले. ब्लड फॉर महाराष्ट्र या अभियानांतर्गत हे शिबीर घेण्यात आले. जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी दाभडच्या सरपंच कांचनताई सूर्यवंशी होत्या. कार्यक्रमास वसंत सुगावे, बाळासाहेब भोसीकर, सचिन देशमुख, विश्वंभर पवार, फेरोज पटेल, अरविंद पांचाळ, व्यंकटराव टेकाळे, संजय पाटील, कुलदीप सूृर्यवंशी आदी उपस्थित होते.

परशुराम जयंती

उमरी - जुन्या उमरी भागातील श्रीराम मंदिरात भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष राजेश कुलकर्णी, प्रणिता जोशी, मंजू चाटोरीकर, गणेश वैद्य, संतोष चाटोरीकर, मंदार चाटोरीकर, चंदाबाई वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. आरतीने या कार्यक्रमाची सांगता झाली.

रस्त्याचे काम अर्धवट

बरबडा - येथील पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. मात्र हे काम अद्यापही अर्धवटच राहिले आहे. बरबडा परिसरातील गोदमगाव, अंचोली, हिप्परगा, कृष्णूर, बरबडा, टाकळी या रस्त्याचे कामही अर्धवटच आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे काम हाती घेण्यात आले आहे. मुदत संपूनही संबंधित ठेकेदारावर कारवाई अद्याप करण्यात आली नाही.

पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी

बिलोली - तालुक्यातील कुंडलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. असे असतानाही पीक विम्याची रक्कम मात्र शेतकऱ्यांना मिळाली नाही. जिल्ह्यात इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. मात्र या परिसरातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्वी पैसे द्यावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेंगुलवार, नरेश जिठ्ठावार, शैलेश ऱ्याकावार, सयाराम नरावाड, सचिन कोटलावार, साईनाथ दाचावार आदींनी केली आहे.

Web Title: Crowd at Narsit Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.