CoronaVirus : माजीसैनिकाने जपले सामाजिक दायित्व; २५० कुटुंबांना केली धान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:22 PM2020-03-30T15:22:31+5:302020-03-30T15:23:30+5:30

धनगर टेकडी भागात राहणाऱ्या कुटुंबांना केले धान्याचे वाटप

CoronaVirus: Former soldier chanting social responsibility; Food donation to 250 families | CoronaVirus : माजीसैनिकाने जपले सामाजिक दायित्व; २५० कुटुंबांना केली धान्याची मदत

CoronaVirus : माजीसैनिकाने जपले सामाजिक दायित्व; २५० कुटुंबांना केली धान्याची मदत

Next

मुदखेड : कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे मोलमजुरी करुन आपल्या कुंटुबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना कठीण समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र, यामुळे गोरगरीब कुटुंबाची अन्नधान्य वाचून गैरसोय होत आहे. अशा जवळपास 250 कुटुंबांना शहरातील माजी सैनिक तथा न.प.माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी सामाजिक दायित्व जपत मदतीचा हात देत अन्नधान्याचे वाटप केले आहे. 

शहरातील धनगर टेकडी, मनुरवार गल्ली, मराठा गल्ली या भागातील गरजू गोरगरीब कुंटुबीयांना नगरसेवक लक्ष्मणराव देवदे यांनी स्वखर्चातून अन्यधान्याचा पुरवठा केला. राजमाता पुण्यश्लोक अाहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे अत्यंत शिस्तीमध्ये त्यांनी गरजू कुंटुबीयांना अन्नधान्याचे वाटप केले. देवदे यांच्या मदतीने अनेक वृध्द निराधार महिला या भारावून गेल्या असल्याचे दिसून आले. दरम्यान देवदे यांनी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमांचे शहरवासियातून काैतुक गेल्या जात. यापुर्वी देखील सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून माजी सैनिक लक्ष्मणराव देवदे यांनी अनेकांना मदत केली आहे.

Web Title: CoronaVirus: Former soldier chanting social responsibility; Food donation to 250 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.