CoronaVirus : पसार झालेल्या चारही कोरोना बाधीतांविरुद्ध गुन्हा दाखल; शोध लागत नसल्याने नांदेडकर धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:57 PM2020-05-05T18:57:43+5:302020-05-05T18:58:58+5:30

अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून २० जणांचा शोध सुरु करण्यात आला़ त्यातील १६ जण स्वाधीन झाले़ या सर्वांवर आरोग्य विभागाकडून उपचारही सुरु करण्यात आले़ मात्र उर्वरित चार जण अद्यापही पसार

CoronaVirus: Charges filed against all four corona positive patients that have not found; Nandedkar panicked as the search going on | CoronaVirus : पसार झालेल्या चारही कोरोना बाधीतांविरुद्ध गुन्हा दाखल; शोध लागत नसल्याने नांदेडकर धास्तावले

CoronaVirus : पसार झालेल्या चारही कोरोना बाधीतांविरुद्ध गुन्हा दाखल; शोध लागत नसल्याने नांदेडकर धास्तावले

Next

नांदेड : शहरातील नगीनाघाट परिसरात आढळून आलेल्या २० कोरोनाग्रस्तांपैकी फरार असलेल्या ४ जणाविरोधात अखेर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ़ सुरेशसिंह बिसेन यांनी या संबंधी  सोमवारी सायंकाळी वजीराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़

नांदेडमधून पंजाबमध्ये गेलेल्या यात्रेकरुना तेथे कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर लंगर साहिब गुरुद्वारातील ६७ सेवेकºयांची नमुने घेण्यात आले होते़ या नमुन्यांचा अहवाल २ मे रोजी शनिवारी प्राप्त झाला असता त्यातील २० जण कोरोना बाधीत असल्याचे उघड झाले होते़ मात्र याचवेळी प्रशासनाचा हलगर्जीपणाही चव्हाट्यावर आला होता़ स्वॅब नमुने घेतल्यानंतर वरील सर्व ६७ जणांना प्रशासनाने क्वारंटाईन करणे आवश्यक होते़ मात्र तसे न केल्याने 9 असल्याने अखेर मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ सुरेशसिंह बिसेन यांनी चौघाविरोधात सोमवारी सायंकाळी वजीराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यावरुन मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला़

दरम्यान, नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त यांनी महानगरपालिका हद्दीतील नगिनाघाट गुरुद्वारा परिसर या क्षेत्रामध्ये कोविड-१९ चे रुग्ण आढळून आल्यामुळे नगिनाघाट गुरुद्वारा परिसर, गुरुद्वारा लंगरसाहेब कंपाऊंड, बडपुरा, शहिदपूरा, रामकृष्ण टॉकिज, परिसर या क्षेत्रामध्ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत केले असून येथे विविध उपाययोजना व नियोजनासाठी पाच अधिकाºयाची नियुक्तीही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.  

स्वॅब घेताना अनेकांची नावेही नोंदविली अर्धवट
नगीनाघाट परिसरातील २० जण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळल्याने नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती़ २ मे रोजी हा अहवाल प्राप्त झाल्यापासून वरील २० पैकी ४ कोरोना बाधीत रुग्णांचा धांगपत्ता लागलेला नाही़ प्रशासनाने  स्वॅब नमुने घेतल्यानंतर या सर्वांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते़ मात्र ही कार्यवाही झाली नाही़ दुसरीकडे स्वॅब घेताना अनेकांची नावेही अर्धवट नोंदविली गेल्याने प्रशासनासमोरचा गुंता आणखीनच वाढला आहे़ विशेष म्हणजे बाधीत आढळलेल्या २० पैकी केवळ १२ जणांकडेच मोबाईल होता़ असेही आता पुढे येत आहे़

तीन दिवसांपासून प्रशासनाची शोध मोहिम
नगीनाघाट परिसरातील बाधीत आढळलेले चौघेजण २ मे पासून पसार असल्याचे पुढे आल्यानंतर एकच खळबळ उडाली़ प्रशासनाने या चौघांच्या शोधासाठी बैठकावर बैठका घेत शोध मोहिम राबविण्यास सुरुवात केली असली तरीही या प्रकारामुळे अवघे जिल्हावासीय धास्तावल्याचे चित्र आहे़ या प्रकारानंतर लंगर साहिब गुरुद्वारा परिसर प्रशासनाने कंन्टेन्मेट झोन जाहीर करीत या भागात मोठा फौजफाटाही तैनात केलेला आहे़ प्रसार असलेले चौघेजण इतरांच्या संपर्कात आल्यास मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता असून, यामुळे यंत्रणेचीही झोप उडाली आहे़ 

Web Title: CoronaVirus: Charges filed against all four corona positive patients that have not found; Nandedkar panicked as the search going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.