coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 03:49 PM2020-08-11T15:49:37+5:302020-08-11T15:52:08+5:30

उमरी ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत दोन डॉक्टर व एका परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

coronavirus: Another doctor's report positive in Umari; The stress on the medical system increased | coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला

coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला

Next
ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडणार आहे.ग्रामीण रुग्णालयात आता दोनच डॉक्टरांवर आरोग्यसेवेची जबाबदारी

उमरी (जि.नांदेड ) : येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या आणखी एका  वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. चंदापूरे  यांनी दिली. यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे. 

यापूर्वी याच ग्रामीण रुग्णालयातील एक डॉक्टर व एका परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना विलगीकरण करण्यात आले. आता पुन्हा एक डॉक्टर पॉझिटीव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या परिचारिका, रुग्ण तसेच रुग्णालयातील कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्याचे काम चालू झाले. 

दोन डॉक्टरांवर जबाबदारी 
यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडणार आहे. ग्रामीण रुग्णालयात आता दोनच डॉक्टरांवर आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग तसेच कोवीड केअर सेंटरच्या देखभालीचा भार पडणार आहे.

Web Title: coronavirus: Another doctor's report positive in Umari; The stress on the medical system increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.