The bodies of both the wells in the well in Borwadi Shivar | बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह
बोरवाडी शिवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह

भोकर : तालुक्यातील बोरवाडी शिवारातील विहिरीत १५ वर्षीय मुलगी आणि २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी आढळल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
यातील मयत मुलगी तालुक्यातील समंदरवाडी येथील आश्विनी शेषेराव वागतकर (वय १५) तर मयत तरुण तालुक्यातीलच बाचोटी कॅम्प येथील विठ्ठल श्रीरंग वाघमारे (वय २५) या दोघांचे मृतदेह बोरवाडी शिवारातील शेषेराव कोठूळे यांच्या शेतातील विहिरीत बुधवारी सकाळी ७ वाजता आढळून आले. घटनेची माहिती कळताच भोकर पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत मुलीचे वडील शेषेराव वागतकर यांनी दिलेल्या खबरी वरून मयत मुलगी विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरुन पाण्यात पडून मृत्यू झाल्याची नोंद घेवून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मयत तरुणाचे नातेवाईकांनी अद्यापपर्यंत कसलीही फिर्याद दिली नव्हती. दोघांच्याही मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत मुलगी शालेय विद्याथीर्नी असल्याचे कळते तर मयत विठ्ठल वाघमारे हा विवाहित असून दोन महिन्यांची मुलगी आहे. तो बोरवाडी येथे सुरु असलेल्या बंधाऱ्याच्या कामावर मजूरीचे काम करीत होता. अशा परिस्थितीत मयत दोघे एकाच विहिरीत एकाच वेळी मृतावस्थेत कसे आढळून आले.
दुचाकी चोरीची घटना
शहरातील शिवाजीनगर भागात दुचाकी चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. महिंद्रा फायनान्ससमोर एम.एच.२६-एव्ही ७२६६ क्रमांकाची तर एसबीआय बँकेसमोरुन एम.एच.२६/एआर ३९६६ क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


Web Title: The bodies of both the wells in the well in Borwadi Shivar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.