उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:58 PM2020-05-21T13:58:35+5:302020-05-21T14:00:34+5:30

दुचाकीस्वाराने वृद्धास जोरदार धडक दिली

Bike rider killed in accident near Umari; One seriously injured | उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी  

उमरीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार; एकजण गंभीर जखमी  

googlenewsNext
ठळक मुद्देअधिक उपचारासाठी नांदेडला नेताना तरुणाचा मृत्यू

उमरी : तालुक्यातील तळेगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. राहुल भगवान पडलवाड ( १८,रा . तळेगाव ) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. बुधवारी ( दि.२० ) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल हा दुचाकीवरून  तळेगावकडे जात होता. यावेळी रस्त्याने पायी जात असलेल्या कोंडीबा जळबा डुबुकवाड ( ६०, रा. कुंचेली ) या वृद्धास राहुलच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यावेळी   दोघेही खाली पडले व गंभीररित्या जखमी झाले. राहुलच्या डोक्‍याला तर कोंडीबा डुबूकवाड यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ . माधव विभूते यांनी त्यांना अधिक उपचारासाठी नांदेडला रवाना केले. मात्र रात्री अकरा वाजेच्या सुमारास वाटेतच राहुल याचा मृत्यू झाला.

Web Title: Bike rider killed in accident near Umari; One seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.