Deglur Bypoll: “अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार”; काँग्रेस नेत्याने केला निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 09:53 PM2021-11-02T21:53:37+5:302021-11-02T21:54:35+5:30

Deglur Bypoll: अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असा निर्धार करण्यात आला आहे.

bhaskarrao patil khatgaonkar said that will try to make ashok chavan the chief minister again | Deglur Bypoll: “अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार”; काँग्रेस नेत्याने केला निर्धार

Deglur Bypoll: “अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार”; काँग्रेस नेत्याने केला निर्धार

Next

नांदेड: पहिल्या फेरीपासून मिळवलेली आघाडी कायम ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Deglur Bypoll) दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सुभाष साबणे यांचा पराभव करत जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यानंतर आता अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत, असा निर्धार काँग्रेस नेते आणि अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी केल्याचे सांगितले जात आहे. 

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयातून अशोक चव्हाण यांचे कुशल नेतृत्व दिसून येते. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वामुळेच या निवडणुकीतील यश मिळू शकले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे. जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आता अशोक चव्हाणांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत, असे भास्करराव पाटील खतगावकर यांनी म्हटले आहे. 

भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला

भाजपने खालची पातळी गाठून प्रचार केला होता. त्याला देगलूर बिलोलीच्या जनतेने साथ दिली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली. हा विजय लोकांचा विजय आहे. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईला लोकांची नेहमीच साथ मिळालेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पूर्वीपेक्षा या वेळेला जास्त मतदान मिळाले. हा विजय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या निकालानंतर दिली. 

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीसमोर देगलूर-बिलोली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार असलेले सुभाष साबणे यांचा तब्बल २२ हजार ३३० मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांना ८८ हजार १८१ तर सुभाष साबणे यांना ६५ हजार ८५१ मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांनी भाजपचे तर दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली. जितेश यांनी साबणे यांच्यावर तब्बल ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला. पिता आणि पुत्राने लागोपाठ दोन निवडणुकीत एकाच उमेदवाराचा पराभव केल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title: bhaskarrao patil khatgaonkar said that will try to make ashok chavan the chief minister again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.