नांदेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालय फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:52 PM2020-01-15T18:52:14+5:302020-01-15T18:52:33+5:30

नांदेड साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांची संक्रांत 

Angry farmers smash offices of sugar co-op in Nanded | नांदेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालय फोडले

नांदेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालय फोडले

Next
ठळक मुद्देकार्यालयाच्या काचा, खुर्च्यांची तोडफोड करत निषेध नोंदवला.

नांदेड : यंदा एकरकमी एफआरपी  दिलेल्या थकीत रकमेवर व्याज आकारणी सुरू करा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक, कार्यालय येथे सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. संतप्त शेतकऱ्यांनी सदर कार्यालयाच्या काचा, खुर्च्यांची तोडफोड करत निषेध नोंदवला.

महाराष्ट्र शुगर परभणी या कारखान्यांकडील थकीत बाकी शेतकऱ्यांना मिळेपर्यंत ट्वेंटी शुगर कारखान्याला दिलेला गाळप परवाना रद्द करा, महाराष्ट्र शुगर कारखाना बाबतीत NCLT च्या निर्णयाविरोधात आयुक्त कार्यालयाने याचिका दाखल करावी, २०१४-१५ चे विलंब व्याज न देणाऱ्या कारखान्यावर आरआरसी कार्यवाही करावी आदी मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आयुक्त कार्यालय पुणे यांच्या लेखी आश्वासनाशिवाय  आजचे आंदोलन संपणार नाही वेळप्रसंगी येथेच मुक्काम करू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याचे प्रल्हाद इंगाेले यांनी सांगितले.

Web Title: Angry farmers smash offices of sugar co-op in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.