नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात सत्र सुरूच;बस-कंटेनरच्या समोरासमोर धडकेत २६ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:19 PM2022-05-12T12:19:47+5:302022-05-12T12:20:21+5:30

सर्व जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident season continues on Nanded-Nagpur highway; 25 injured including bus driver in ST bus-container collision | नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात सत्र सुरूच;बस-कंटेनरच्या समोरासमोर धडकेत २६ जण जखमी

नांदेड-नागपूर महामार्गावर अपघात सत्र सुरूच;बस-कंटेनरच्या समोरासमोर धडकेत २६ जण जखमी

googlenewsNext

अर्धापूर (नांदेड): नांदेड - नागपूर महामार्गावरील पार्डीजवळ आज सकाळी १० वाजेच्या सुमारास बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात बस चालक आणि १० प्रवासी गंभीर जखमी असून १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, नांदेड ते हिंगोली मार्गे जाणारी बस ( एम एच २० बी एल १७०७ ) व वारंगा ते नांदेड मार्गे येणाऱ्या कंटेनरची (आर.जे. ३२ जी.बी. ७१०१ ) पार्डी म. येथील गुरूद्वारासमोर समोरासमोर धडक झाली. यात बस चालक रेशमाजी फुले (५५) तसेच प्रवासी गोदावरी पवार  (६५) , गंगाराम पवार (७२, शाहापुर वाडी) , यशवंत लढे मेंढला ( ४५) , विजय राजे पुसद ( ७०) , सुभाष मस्के ( ६५) यांच्यासह आणखी ४ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर १५ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

सदर घटनास्थळी १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.आनंद शिंदे, चालक रणधीर लंगडे व महामार्ग पोलीस रमाकांत शिंदे,ज्ञानेश्वर तिडके,गजानन कदम, संभाजी मोरे, वसंत सिनगारे परिसरातील नागरिकांनी जखमींना मदत करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. 

Web Title: Accident season continues on Nanded-Nagpur highway; 25 injured including bus driver in ST bus-container collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.