Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:04 IST2025-12-02T14:02:21+5:302025-12-02T14:04:28+5:30
Saksham Tate Murder Case: नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाली. २१ वर्षीय आंचल ममदीवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले होते. यामुळे हे प्रकरण देशात चर्चेत आले आहे.

Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाली. २१ वर्षीय आंचल ममदीवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले होते. यामुळे हे प्रकरण देशात चर्चेत आले आहे. या प्रकरणातील आरोपी तरुणीचे वडील आणि भाऊ आहेत. काही महिन्यांपूर्वी सक्षमच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आंचलने केला आहे. सक्षम आणि आंचलच्या भावांचा डान्सचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आंचलने तिच्या वडिलांविरुद्ध आणि भावाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी आंचलचा भाऊ हिमेश आणि सक्षममध्ये भांडण झाले होते. हिमेशने सक्षमवर गोळी झाडली, गोळी त्याच्या बरगड्यांमधून गेली आणि त्यानंतर त्याने त्याच्या डोक्यात फरशीने मारले. यामुळे तो जागीच ठार झाला. घटनेनंतर हिमेश, त्याचा भाऊ साहिल (२५) आणि वडील गजानन ममदीवार (४५) यांना पोलिसांनी अटक केली.
एकत्र नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
आंचलचे वडील गजानन हे आंबेडकर जयंतीमध्ये डिजे समोर डान्स करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ते आंचल, सक्षम आणि त्यांच्या मित्रांसोबत नाचताना दिसत आहेत. ते आनंदी दिसत आहेत. गजाननने यावेळी आपल्या मुलीला मिठी मारली. सक्षमचे मित्र आरोपीला खांद्यावर घेऊन डान्स करत असल्याचे दिसत आहे.
हत्येपूर्वी आंचलचे वडील आणि भावाने सक्षमचा विश्वास मिळवण्याचा डान्स केल्याचे समोर आले आहे. त्याची हत्या करण्याचा कट आधीपासून त्यांनी केला होता.
दरम्यान, सोमवारी आंचलने इतवारा पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांवरगंभीर आरोप केले. त्या पोलिसांनी सक्षमच्या हत्या करण्यासाठी भावांना भडकावले असल्याचा आरोप तिने केला. मृताच्या घरी, महिलेने तिच्या प्रियकराच्या हत्येसाठी तिच्या भावाला फाशी देण्याची मागणी केली.
"हत्येच्या दिवशी, माझा भाऊ हिमेश सकाळी मला इतवारा पोलिस ठाण्यात घेऊन गेला आणि सक्षमविरुद्ध तक्रार दाखल करण्यास सांगितले. पण मी खोटी तक्रार दाखल करण्यास नकार दिला, असेही आंचलने सांगितले.