जिल्ह्यात ४०९ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:09+5:302021-05-17T04:16:09+5:30

रविवारी १ हजार ५३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ हजार २६२ अहवाल निगेटिव्ह तर २३३ अहवाल पॉझिटिव्ह आढळले. आरटीपीसीआर ...

409 patients overcome corona in the district | जिल्ह्यात ४०९ रुग्णांची कोरोनावर मात

जिल्ह्यात ४०९ रुग्णांची कोरोनावर मात

Next

रविवारी १ हजार ५३२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १ हजार २६२ अहवाल निगेटिव्ह तर २३३ अहवाल पॉझिटिव्ह आढळले. आरटीपीसीआर तपासणीत मनपा हद्दीत ४९ रुग्ण आढळले. नांदेड ग्रामीणमध्ये ११, अर्धापूर ५, भोकर ५, बिलोली ४, देगलूर ८, धर्माबाद ९, हदगाव ११, कंधार ३, किनवट १, लोहा ११, मुदखेड १, मुखेड ३, नायगाव ५, उमरी २ आणि हिंगोली जिल्ह्यातील ५ रुग्ण बाधित आढळले. ॲन्टीजेन तपासणीत मनपा हद्दीत ४०, नांदेड ग्रामीण १८, अर्धापूर १, भोकर ३, बिलोली २, देगलूर ८, हिमायतनगर १, कंधार २, लोहा २, माहूर ४, मुदखेड १, मुखेड २, उमरी ३, परभणी ३ आणि यवतमाळ जिल्ह्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ३ हजार २३५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील १२८ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. सर्वाधिक ९४ रुग्ण हे विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये ५९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नवी इमारत ६६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २१, किनवट कोविड रुग्णालय ६१, मुखेड ४३, देगलूर १५, बिलोली ८५, नायगाव ९, उमरी १८, माहूर १४, हदगाव २१, लोहा २२, कंधार १. धर्माबाद २५, मुदखेड ५, अर्धापूर ११. हिमायतनगर ११, बारड १४, मांडवी १, मालेगाव ४, भक्ती कोविड सेंटर ४, एनआरआय ३ आणि खाजगी रुग्णालयात ५९३ रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणात मनपा अंतर्गत ७१८ तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत १ हजार ३१७ रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट-----------

जिल्ह्यात १० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात रविवारी १० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये देगलूर येथील ५४ वर्षीय पुरुष, माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील ६२ वर्षीय महिला, नांदेड जवळील वाडी येथील ८५ वर्षीय महिला, मुखेडमधील ५५वर्षीय महिला, देगलूर येथील ८५वर्षीय पुरुष, किनवट येथील ६५ वर्षीय पुरुष, हदगाव तालुक्यातील ल्याहरी येथील ५५ वर्षीय महिला, कंधार तालुक्यातील कौठा येथे ६७ वर्षीय पुरुष, नांदेडमधील तरोडा भागातील ५१ वर्षीय महिला आणि नांदेड तालुक्यातील नांदेगाव येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मयतामध्ये समावेश आहे.

Web Title: 409 patients overcome corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.