३५२ जणांवर उपचार तर १२ जणांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:02+5:302021-01-15T04:16:02+5:30

नांदेड : कोरोना तपासणी नमुन्यांचे ८५९ अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यातील २५ अहवालबाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची ...

352 were treated and 12 were in critical condition | ३५२ जणांवर उपचार तर १२ जणांची प्रकृती गंभीर

३५२ जणांवर उपचार तर १२ जणांची प्रकृती गंभीर

Next

नांदेड : कोरोना तपासणी नमुन्यांचे ८५९ अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यातील २५ अहवालबाधित आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २१ हजार ९८४ एवढी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यात एकूण ३५२ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

गुरुवारी प्राप्त झालेल्या ८५९ अहवालांमध्ये २५ अहवाल बाधित आढळले. त्यातील १२ अहवाल आरटीपीसीआर तपासणीद्वारे तर १३ ॲन्टीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आलेल्या अहवालामध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ८ तर किनवट, उमरखेड, हदगाव आणि मुदखेड येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे तर ॲन्टीजेन तपासणीद्वारे बाधित निघालेल्या १३ अहवालांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रातील ३, किनवट येथील ४, बिलोली आणि उमरी येथील प्रत्येकी २ आणि माहूर व नायगाव येथील प्रत्येकी एका अहवालाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्मातील विविध रुग्णालयांत ३५२ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४, जिल्हा रुग्णालय २१, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत १७, मुखेड कोविड रुग्णालय १२, हदगाव ५, महसूल कोविड केअर सेंटर २८, किनवट ४, देगलूर ८, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात १३०, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणामध्ये ५३, हैदराबाद येथे संदर्भीत २ आणि खासगी रुग्णालयात ३८ जणांवर उपचार सुरू आहे.

२० हजार ८५३ जणांची आजवर कोरोनावर मात

n गुरुवारी जिल्ह्यातील आणखी ४० बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यामध्ये विष्णूपुरी रुग्णालयातील २. मनपाअंतर्गत गृह विलगीकरणातील १८, देगलूर, हदगाव, नायगाव आणि जिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी २, खाजगी रुग्णालयातील ४, माहूर तालुक्यांतर्गत ६ तर मुखेड, बिलोली येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाला. सद्य:स्थिती ३५२ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १२ जणांची प्रकृती गंभीर असून तीन स्वॅब नमुन्यांचे अहवाल अनिर्णीत आहेत.२० हजार ८५३ जणांची आजवर कोरोनावर मात

Web Title: 352 were treated and 12 were in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.