नांदेड जिल्ह्यात १०८ बाधितांची भर; तर २७१ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 07:12 PM2020-10-13T19:12:40+5:302020-10-13T19:15:01+5:30

coronavirus In Nanded चौघांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे.

108 corona positive in Nanded district; While 271 were corona free | नांदेड जिल्ह्यात १०८ बाधितांची भर; तर २७१ जण कोरोनामुक्त

नांदेड जिल्ह्यात १०८ बाधितांची भर; तर २७१ जण कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्देजिल्हयात कोरोनाचे एकूण १७ हजार ६०२ रुग्ण झाले आहेत. कोरोना मृत्यू संख्या ४६१ वर पोहोचली आहे.

नांदेड : जिल्हयात कोरोनाचे नवे १०८ रुग्ण आढळले आहेत. चौघांचा उपचारा दरम्यान मृत्यूही झाला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी २७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. चौघांचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला आहे.

मंगळवारी ८६१ संशियतांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७३४ अहवा निगेटिव्ह आले. तर १०८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ४७ रुग्ण हे आरटीपीसीआर तर ६१ रुग्ण हे अ‍ॅन्टीजेन तपासणीत बाधीत आढळले आहेत.  आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्रात ३१ रुग्ण बाधीत आढळले. भोकरमध्ये १, लोहा २, देगलूर १, बिलोली २, कंधार २, नांदेड ग्रामीण १, मुदखेड २, किनवट २, उमरी १ व हिंगोलीतील २ रुग्णांचा समावेश आहे. ॲन्टीजेन तपासणीत महापालिाक हद्दीतील ३२, लोहा ३, मुदखेड १, भोकर १, मुखेड ६, उमरी १, नायगाव २, नांदेड ग्रामीण ७, अधार्पूर १, किनवट ४, बिलोली १, कंधार १ व धर्माबाद येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हयात मंगळवारी चार रुग्णाचां मृत्यू झाला. मयतामध्ये नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील ५४ वर्षीय पुरुष, जैतापूर येथील ८५ वर्षीय पुरुष, हडको येथील ६६ वर्षीय महिला आणि लोहा तालुक्यातील देऊळगाव येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हयात आजघडीला २ हजार १३२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ५० रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. ४७६ स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.जिल्हयात कोरोनाचे एकूण १७ हजार ६०२ रुग्ण झाले आहेत. तर मृत्यू संख्या ४६१ वर पोहोचली आहे.

Web Title: 108 corona positive in Nanded district; While 271 were corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.