Yogesh Pande of 'Lokmat' has been awarded the Madkholkar Award | ‘लोकमत’चे योगेश पांडे यांना माडखोलकर पुरस्कार जाहीर
‘लोकमत’चे योगेश पांडे यांना माडखोलकर पुरस्कार जाहीर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घोषणा केली. २०१८ मधील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांतील नागपूर विभागाचा ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार लोकमत,नागपूरचे ‘डेप्युटी चिफ सबएडिटर’ योगेश प्रकाश पांडे यांना जाहीर झाला आहे. २७ जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


Web Title: Yogesh Pande of 'Lokmat' has been awarded the Madkholkar Award
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.