यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीला प्रत्येकी २० मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:18 PM2021-05-03T23:18:30+5:302021-05-03T23:20:21+5:30

oxygen supply, Nitin Gadkari विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी आढावा घेतला. या बैठकीत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. यानुसार वर्धा जिल्ह्याला दररोज ४० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांना प्रत्येकी २० मेट्रिक टन तर भंडारा व गोंदिया येथे १० मेट्रिक टन ऑक्सि

Yavatmal, Chandrapur, Amravati 20 M.Tons of oxygen supply | यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीला प्रत्येकी २० मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा

यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीला प्रत्येकी २० मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा

Next
ठळक मुद्देवर्ध्याला दररोज ४० मे. टन ऑक्सिजन जाणार : आढावा बैठकीत नितीन गडकरी यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी आढावा घेतला. या बैठकीत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. यानुसार वर्धा जिल्ह्याला दररोज ४० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांना प्रत्येकी २० मेट्रिक टन तर भंडारा व गोंदिया येथे १० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांना पुण्यातून पुरवठा होत असून, त्यांची मागणी आल्यास त्यांनादेखील पुरवठा करण्याची त्यांनी सूचना केली.

या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., वाहतूक पुरवठादार प्यारे खान व अन्य अधिकारी उपस्थित होते. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील ऑक्सिजनची सद्यस्थिती काय आहे, या जिल्ह्यांना रोज किती ऑक्सिजनची गरज आहे, पुरवठा किती होतो, प्रत्येक जिल्ह्याची ऑक्सिजन साठवणूक क्षमता किती आहे, याचा आढावा घेण्यात आला. ज्या जिल्ह्यात आणि रुग्णालयात साठवणूक क्षमता नाही अशा रुग्णालयांनी साठवणीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पुरवठादार यांनी ऑक्सिजन टँकरच्या दिवसभरात जास्तीत जास्त फेऱ्या कशा होतील, याचे नियोजन करण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले.

Web Title: Yavatmal, Chandrapur, Amravati 20 M.Tons of oxygen supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.