शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
3
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
5
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
6
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
7
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
8
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
9
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
10
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
11
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
12
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
13
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
14
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
15
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
16
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
17
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
18
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
19
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
20
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 05:53 IST

ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला.  त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

मंगेश व्यवहारे

नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून रंगलेली चर्चा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेगळ्याच वळणावर नेली.  एक पक्ष दोन गटाच्या सरकारमध्ये एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत.

ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला.  त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली. या चर्चेत शिंदेसेनेच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनीही आपली स्पष्टोक्ती देत ते आमचेच आमदार असल्याचे सूतोवाच करीत आदित्य ठाकरेंच्या दाव्याला पूर्णविराम दिला.

शिंदेसेना खरी शिवसेना, तो आमचा मित्रपक्ष : मुख्यमंत्री

सत्ताधाऱ्यांच्या एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचतात, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सभागृहाबाहेर केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदेसेना खरी शिवसेना आहे. तो आमचा मित्रपक्ष आहे. त्यांचे आमदार घेऊन आम्ही काय करणार, ते आमचेच आमदार आहेत, असे राजकारण आम्ही करीत नाही. उलट शिंदेसेना मजबूत व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे.

आदित्य ठाकरेंचे सूत्र चुकीचे : संजय शिरसाट

शिंदेसेनेचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत, अशी माहिती विधिमंडळ परिसरात आदित्य ठाकरेंनी दिली. मुळात त्यांना माहिती देणारे सूत्रच चुकीचे आहे. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद, मनभेद नाहीत. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असून, ते कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधिमंडळ परिसरात दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Claims and Counter-Claims Over MLAs' Defection; CM Says They're Ours

Web Summary : Aditya Thackeray's claim that 22 MLAs from one group are under the CM's influence sparked debate. CM Fadnavis refuted this, asserting that the Shinde Sena is their ally and its MLAs are already part of their coalition. Sanjay Shirsat dismissed Thackeray's information as incorrect.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस