कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 12:15 AM2020-07-09T00:15:28+5:302020-07-09T00:16:55+5:30

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त्यानंतरही अधिकारी कामगारांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करीत आहेत. हे क्वारंटाईन जवळपास २८ दिवसांचे असल्याने कंपनीत कामावर कुणीही कामगार राहत नाहीत. त्यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडत आहे.

Why is the company closed for a month due to coronary heart disease? | कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ?

कोरोनाबाधितांमुळे कंपनी एक महिना बंद कशासाठी ?

Next
ठळक मुद्देउद्योजकांना त्रास : कामगार देतात ईएसआयसीकडे सुटीचा अर्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यास कंपनी दोन वा तीन दिवस बंद ठेवून पुन्हा सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. पण तसे होताना दिसत नाही. कंपनी पूर्णपणे बंद करणार नाही, अशी ग्वाहीही जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांना भेट देऊन केली होती. त्यानंतरही अधिकारी कामगारांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करीत आहेत. हे क्वारंटाईन जवळपास २८ दिवसांचे असल्याने कंपनीत कामावर कुणीही कामगार राहत नाहीत. त्यामुळे कंपनी पूर्णपणे बंद पडत आहे. ही बाब हिंगणा एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत कोरोनाबाधितामुळे ड्युरवेल्ड आणि हसीफ फार्मा या दोन कंपन्यांमध्ये घडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगणा एमआयडीसीच्या पदाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात संवाद साधला होता. कंपनी पूर्णपणे बंद होणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास १४ दिवस इन्स्टिट्युशनल आणि १४ दिवस होम क्वारंटाईन असे एकूण कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. त्यामुळे कंपन्यांमधील काम पूर्णपणे ठप्प पडत असल्याचा उद्योजकांचा सूर आहे.

कामगार ईएसआयसीमध्ये करतात सुटीचे अर्ज
एखाद्या कंपनीत कामगार कोरोनाबाधित निघाल्यास कामगार क्वारंटाईनसह ईएसआयसीमध्ये सुटीचे अर्ज करतात. शिवाय क्वारंटाईनच्या नावाखाली कामावर येत नाहीत. त्यामुळे कंपनी बंद करावी लागते. ही वेळ कंपनीवर येऊ नये.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन.

अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा
कोरोनाबाधितामुळे एखादी कंपनी बंद पडू नये याकरिता अधिकाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा. रुग्णावर उपचार करून संबंधित कामगारांची तपासणी करून कामावर येण्यास सांगावे. शिवाय संपूर्ण परिसर सॅनिटाईझ्ड करून दोन ते तीन दिवसात कंपनी सुरू करावी.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन.

कंपनीच्या विकासात कोरोनाची बाधा
नागपूर जिल्ह्यात सध्या २५५० उद्योग सुरू असल्याची नोंद आहे. या उद्योगांमध्ये ५५ हजारांच्या आसपास कामगार काम करीत असून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कंपनीत विविध वस्त्यांमधून कामगार येत असल्याने मालकाने त्यांची नियमानुसार तपासणी करणे आवश्यक आहे. जर एखाद्या कंपनीत कोरोना रुग्ण निघाल्यास कंपनी दोन ते तीन दिवसाऐवजी अनेक दिवसांसाठी बंद होते. प्रशासनाने संपूर्ण परिसर सॅनिटाईज्ड करून कंपनी लवकरात लवकर कशी सुरू होईल, यावर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे काही उद्योजकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या कमी कामगार संख्येत उत्पादन सुरू असून कंपन्याही सरासरी ६० ते ७० टक्के क्षमतेने सुरू आहेत.

उत्पादन होईलच, प्रारंभी जीव महत्त्वाचा
हिंगणा येथील कारखान्यात कोरोनाचे जास्त रुग्ण मिळाल्याने कंपनी सुरू होण्यास उशीर झाला. पण एखाद्या कंपनीत कोरोना रुग्ण आढळून येत असेल तर असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे. सॅनिटायझेशन, कामगारांच्या सुट्यांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये. एका युनिटसाठी पूर्ण कंपनी बंद होऊ नये. सर्वांनी हेल्पलाईन क्रमांकाच्या संपर्कात राहावे आणि संपूर्ण नियमांचे पालन करावे.
सुरेश राठी, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन.

Web Title: Why is the company closed for a month due to coronary heart disease?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.