राममंदिराचा ढाचा आम्हीच उभारला : संजय राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:11 AM2019-12-18T00:11:43+5:302019-12-18T00:12:54+5:30

अयोध्येमधील राममंदिराचा ढाचा आम्हीच अर्थात आमच्या लाखो शिवसैनिकांनी उभारला. त्यामुळे या विषयाची अस्मिता भाजपाएवढीच आम्हालाही आहे. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचे जाहीर प्रगटन करावे, हे भाजपाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

We built the Ram Mandir structure: Sanjay Raut | राममंदिराचा ढाचा आम्हीच उभारला : संजय राऊत 

राममंदिराचा ढाचा आम्हीच उभारला : संजय राऊत 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येमधील राममंदिराचा ढाचा आम्हीच अर्थात आमच्या लाखो शिवसैनिकांनी उभारला. त्यामुळे या विषयाची अस्मिता भाजपाएवढीच आम्हालाही आहे. मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचे जाहीर प्रगटन करावे, हे भाजपाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सावरकरांच्या मुद्यावरून भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा रेटत आहे. शिवसेनेने हिंदुत्व कृतीतून दाखवावे, असेही फडणवीस सांगत आहेत. खरे तर हातची सत्ता गेल्याने भाजपा अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेतूनच ते सामनामधील वृत्ताचे बॅनर विधिमंडळात झळकवीत आहेत. आम्ही त्यांना आधीपासूनच सचेत करीत होतो. मात्र सामना आधी वाचला असता तर सत्ता जाण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
आम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बांधील आहेत. त्यांच्यापासून पक्ष आणि सरकार दूर जाणार नाही. मात्र भाजपाने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे ते म्हणाले.

Web Title: We built the Ram Mandir structure: Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.