नागपुरात भाजयुमोने जाळला वारीस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 09:04 PM2020-02-21T21:04:31+5:302020-02-21T21:05:41+5:30

हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सक्करदरा चौकात आंदोलन केले व त्यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला.

Waris Pathan's statue burnt by BJYM in Nagpur | नागपुरात भाजयुमोने जाळला वारीस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा 

नागपुरात भाजयुमोने जाळला वारीस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा 

googlenewsNext

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : हिंदू-मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे ‘एमआयएम’चे माजी आमदार वारीस पठाण यांचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी सक्करदरा चौकात आंदोलन केले व त्यांचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला.
काल कर्नाटक येथील गुलबर्गा येथे वारीस पठाण यांनी जे विधान केलं हिंदू आणि मुसलमानांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होता. सर्व मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात उभे राहण्याचं जे आव्हानं केले ते देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठीच होते असा आरोप ‘भाजयुमो’तर्फे करण्यात आला. यावेळी ‘एमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या भाषणाच्या मंचावरुन पाकिस्तान समर्थनार्थ नारेबाजी करणाऱ्या मुलीचादेखील निषेध करण्यात आला. यावेळी भाजयुमो शहराध्यक्षा शिवानी दाणी वखरे, महामंत्री राहुल खंगार, संपर्क प्रमुख नेहल खानोरकर, रोहित हिमते, मंडळ अध्यक्ष वैभव चौधरी,दीपांशु लिगायत, अलोक पांडे, कमलेश पांडे, सचिन करारे, सारंग कदम, पीयूष बॉईनवर, संकेत कुकडे, गोविंद काटेकर, आशिष घारड, कैलास कोरडे, अमर धारमरे, विक्की कोंबे, योगी पाचपोर, सचिन सावरकर, यश सातपुते, प्रणय पाटणे, जय साजवानी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Waris Pathan's statue burnt by BJYM in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.