नागनदीच्या सांडपाण्याने वैनगंगा प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:50 AM2020-02-29T10:50:48+5:302020-02-29T10:52:47+5:30

नागनदीतून वाहणारे सांडपाणी व घाणीमुळे वैनगंगा नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.

Waganga polluted by sewage | नागनदीच्या सांडपाण्याने वैनगंगा प्रदूषित

नागनदीच्या सांडपाण्याने वैनगंगा प्रदूषित

googlenewsNext
ठळक मुद्देशुद्धीकरणाशिवाय पाणी पिण्यायोग्य नाहीजलवनस्पती, किडे व जीवाणूंचे प्रमाण प्रचंड वाढलेनीरीचे परीक्षण

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागनदीतून वाहणारे सांडपाणी व घाणीमुळे वैनगंगा नदीच्याप्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलवनस्पती व जलकिड्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. दुसरीकडे प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यात गढूळपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य नाही, असे परीक्षण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने नोंदविले आहे.
नीरीच्या वैज्ञानिकांनी जून २०१८ मध्ये गोसेखुर्द धरणाच्या आसपासच्या परिसरातून वैनगंगा नदीच्या पाण्याचे परीक्षण केले होते. त्यानुसार एकीकडे थांबलेल्या पाण्यावर ई-कॉर्निया वनस्पतीचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील आक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे सर्वाधिक परिणाम नागपुरातून नागनदीद्वारे वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे झाल्याची नोंद या रिपोर्टमध्ये नोंदविली आहे. शहराचे सांडपाणी नागनदीद्वारे वाहत पानमारा गावाजवळ कन्हान नदीला मिळते आणि कन्हान नदीद्वारे ते वैनगंगेला मिळते. या प्रदूषित सांडपाण्यामुळे वैनगंगेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या प्रदूषणामुळे गढूळपणा (टर्बिडिटी) वाढला आहे तसेच चिल्यासारख्या जल वनस्पती व जलकिड्यांचे प्रमाणही मोठ्याने वाढले आहे. शिवाय प्रदूषित पाण्यात वाढणाºया जिवाणूंचे प्रमाणही धोकादायक प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शुद्धीकरण के ल्याशिवाय वैनगंगा नदीचे पाणी पिण्यास अजिबात योग्य नाही, असा स्पष्ट रिपोर्ट नीरीने तयार केला आहे. नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाऊ शकते, मात्र या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीवर त्याचे धोकादायक परिणाम होण्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये व्यक्त केली आहे. दरम्यान, नदीच्या पाण्यातील पीएच स्तर, आम्लता, अ‍ॅसिडिटीचा स्तर सामान्य आहे. शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आदी रासायनिकांचा स्तरही सामान्य असून मॅगनीज वगळता जड धातूंचे प्रमाणही नगण्य असल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
नदीच्या पाण्याचे वाढलेले प्रदूषण बघता नदीपात्रातील वनस्पती काढणे, पिण्यासाठी वापरण्यापूर्वी पाण्याची ट्रीटमेंट करणे, नाग नदीचे सांडपाणी वैनगंगेच्या पात्रात जाण्यापासून रोखणे किंवा सांडपाण्याची ट्रीटमेंट क रूनच सोडणे आणि नदीच्या पाण्याचे सातत्याने परीक्षण करून पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात यावी आदी सूचना नीरीने दिल्या आहेत.

नीरीच्या परीक्षण रिपोर्टमधील खुलासा
पाण्यात पीएच स्तर, अल्कलिनिटी, हार्डनेस तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आदी फिजिकोकेमिकल पॅरामीटर्स सामान्य आहे. वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला १० एनटीयू तर तळाशी १७ एनटीयू आहे. ५ एनटीयूचा स्तर सामान्य मानला जातो.
जीवाणूयुक्त प्रदूषण प्रचंड वाढले आहे. टोटल कॉलिफार्म्स शुन्य असायला हवे ते ७० ते २८० सीएफयू/१०० मिलि आहे. फिकल कॉलिफार्म्स (मलविषयक जीवाणू) शुनय असायला हवे ते ५० ते ७० सीएफयू-१०० मिलिपर्यंत वाढले आहे.
फायटोप्लँकटन्स (जल वनस्पती) चे प्रमाण १०० मिलिलीटरमध्ये २ ते ३ लाखापर्यंत वाढले आहे. झुप्लँकटन्स (जलकिडे) चे प्रमाणही ३५१ ते ७५३३/ मीटरक्युबवर पोहचले आहे.

नीरीने केलेल्या सूचना
आॅर्गनिक प्रदूषण रोखण्यासाठी पाणीसाठा करण्यापूर्वी नदीपात्रातील जल वनस्पती, जलपर्णी काढणे गरजेचे आहे.
पिण्यासाठी वापरण्यापूर्वी पाण्याचे योग्य शुद्धीकरण नितांत आवश्यक आहे.
शेतीसाठी पाणी वापरता येईल पण काही पिकांची निवड गरजेची आहे. मायक्रोबियल प्रादुर्भावाचा धोका असल्याने सुरक्षित सिंचन प्रॅक्टीस आवश्यक आहे.
नागनदीचे सांडपाणी वैनगंगेत सोडणे पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण गरजेचे आहे.
गोसेखुर्द धरणपात्रातील पाण्याचे सातत्याने निरीक्षण करण्याची यंत्रणा आखणे आवश्यक आहे.

नीरीतर्फे दोन वर्षापूर्वी वैनगंगेच्या पाण्याचे परीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार पाणी प्रदूषित होत असल्याचे आढळून आले. सूचनेनुसार महापालिकेने ट्रीटमेंट प्लान्ट स्थापन करून सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र गोसेखुर्द पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- डॉ. पवन लाभशेटवार, वरिष्ठ वैज्ञानिक, नीरी

Web Title: Waganga polluted by sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.