वड्याचे तेल वांग्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:49+5:302021-05-12T04:09:49+5:30

तरुणी घरून निघून गेल्याने वाद : शेजाऱ्यावर हल्ला लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लग्न जुळलेली तरुणी शेजारच्या तरुणासोबत ...

Wadya oil on eggplant | वड्याचे तेल वांग्यावर

वड्याचे तेल वांग्यावर

Next

तरुणी घरून निघून गेल्याने वाद : शेजाऱ्यावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लग्न जुळलेली तरुणी शेजारच्या तरुणासोबत निघून गेल्याने संतप्त झालेल्या तिच्या नातेवाइकांनी शेजारी राहणाऱ्या चंदू भदूजी पेंदामकर (६१) यांना लाकडी बत्त्याने मारून जबर जखमी केले.

सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील आंबेडकर चौकाजवळ चंदू पेंदामकर राहतात. त्यांच्या शेजारीच नागेश अंबादे राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादेच्या कुटुंबातील तरुणीचा विवाह जुळला होता. मात्र तिचे प्रेमसंबंध असल्यामुळे ती घरून निघून गेली. त्याचा राग नागेश आणि त्याच्या आईने वृद्ध चंदू पेंदामकर यांच्यावर काढला. सोमवारी रात्री त्यांच्याशी वाद घालून त्यांना लाकडी बत्त्याने मारहाण केली. यामुळे पेंदामकर यांच्या डोळ्याच्यावर जबर जखम झाली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू केला आहे.

---

Web Title: Wadya oil on eggplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.