एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 05:23 PM2021-11-11T17:23:48+5:302021-11-11T17:43:38+5:30

एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे आंदोलन आणखी चिघळत चालले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

vijay wadettiwar reaction on st workers strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले...

Next

नागपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. हा संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे संप आणखी चिघळत चालला आहे. आणि त्यामुळेच राज्यावर ही परिस्थिती ओढावली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. याबाबत आंदोलनकर्त्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची आमची तयारी असल्याचेही ते म्हणाले.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांची ओरड सुरू आहे. ते सत्तेत असताना विलिनीकरण होत नाही असं सांगत होते. मात्र, आता तेच एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीवरून राजकारण करत असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.  

Web Title: vijay wadettiwar reaction on st workers strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.