वाढीव विजबिलावरून विदर्भवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:40 PM2020-07-10T23:40:43+5:302020-07-10T23:43:30+5:30

कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीज बिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जामंत्र्यांना बिल परत करण्यासाठी जात असताना पोलिसांनी विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांना अटक केली.

Vidarbha aggressors from increased power bill | वाढीव विजबिलावरून विदर्भवादी आक्रमक

वाढीव विजबिलावरून विदर्भवादी आक्रमक

Next
ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, अनेकांना अटक व सुटकाविदर्भाला वीज बिल मुक्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटादरम्यान वाढीव वीजबिलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ राज्य आंदोलन समितीने याविरुद्ध आंदोलन छेडले आहे. याअंतर्गत शुक्रवारी ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ‘वीजबिल वापसी’ आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते ऊर्जामंत्र्यांना बिल परत करण्यासाठी जात असताना पोलिसांनी विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांना अटक केली. काही वेळानंतर आंदोलकांना सोडण्यात आले.
कोरोना काळातील वीज बिलापासून विदर्भाला मुक्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व करणारे राम नेवले यांनी सांगितले की, आज विदर्भभर वीज बिल वापसी आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत नागपुरात ऊर्जामंत्र्यांना वीज बिल परत करण्यासाठी कार्यकर्ते जात होते. परंतु पोलिसांनी दडपशाही करीत त्यांना बेझनबाग चौकातच अडवले. बळजबरीने पोलीस व्हॅनमध्ये बसवले व ऊर्जामंत्र्यांच्या घराकडे जाऊ दिले नाही. दरम्यान, यावेळी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. सर्व आंदोलनकांना जरीपटका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे आवारातच एक छोटेखानी सभा झाली.
आंदोलनात राम नेवले, मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, प्रशांत मुळे, रेखा निमजे, माधुरी चव्हाण, गुलाबराव धांडे, प्यारूभाई, साधना श्रीवास्तव, प्रीती दिडमुठे, शोभा येवले, नरेश निमजे, रवी भामोडे, राजेंद्र सतई, नितीन अवस्थी, अनंतराव भुरे, मनोज झोडे, रमीज खान, लता सानेश्वर, जया चातुरकर, करुणा ढवळे, सुयोग निलदावार, शशी गुप्ता, अशोक येवले, शिशुपाल वाळदे, विभा शुक्ला, संजना संधू, कॅप्टन कर्नलसिंग, चंदा तातम, प्रशांत जयकुमार, रामभाऊ कावडकर, सुरेश निनावे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री-ऊर्जामंत्र्यांचे पुतळे पेटवणार
कोरोनामुळे उद्योग, व्यापार, रोजगार बंद आहे. त्यामुळे बिल भरणे बंद आहे. कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल मुक्त करा, याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. सरकार जोवर हा निर्णय घेत नाही तोपर्यंत विदर्भभर वीज बिलाची होळी आंदोलन सुरू राहील. या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांचे पुतळेसुद्धा दहन करण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: Vidarbha aggressors from increased power bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.