खूप घोरताय, आरोग्य सांभाळा! स्लिप ॲपनिया असू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 07:42 PM2021-10-07T19:42:27+5:302021-10-07T19:43:12+5:30

Nagpur News श्वास शरीरात घेण्यास आणि तो बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असल्याने होणाऱ्या आवाजाला ‘घोरणे’ म्हटले जाते. घोरणे हे ‘स्लिप ॲपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे.

Very snoring, take care of your health! There may be sleep apnea | खूप घोरताय, आरोग्य सांभाळा! स्लिप ॲपनिया असू शकतो

खूप घोरताय, आरोग्य सांभाळा! स्लिप ॲपनिया असू शकतो

Next
ठळक मुद्देशारीरिक व मानसिक आजार होण्याचाही धोका

 

नागपूर : श्वास शरीरात घेण्यास आणि तो बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत असल्याने होणाऱ्या आवाजाला ‘घोरणे’ म्हटले जाते. घोरणे हे ‘स्लिप ॲपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. झोपेत अचानक श्वास थांबल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. शिवाय, झोपेत खंड पडल्याने शारीरिक व मानसिक स्वरूपाचे गंभीर आजार होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.

मनुष्य आपल्या जीवनातील एक तृतीयांश भाग झोपेत घालवितो. झोप ही मनुष्यासाठी महत्त्वपूर्ण अवस्था आहे. ती व्यक्तीला ऊर्जावान ठेवते. झोप ही ९०-९० मिनिटांच्या चार ते पाच टप्प्यांतून जाते. प्रत्येक पातळी एक ते चार टप्प्यांची असते. ‘रॅपिड आय मोमेंट’ (रेम) हा टप्पा महत्त्वाचा असतो. झोपेच्या दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात शरीरातील आतील रोग प्रतिकार क्षमता वाढते. रेम स्टेजमध्ये मेंदू रिचार्ज होतो. स्मरण वाढते. जर घोरण्याची समस्या असल्यास एका टप्प्यात जरी गडबडी झाली तरी झोप प्रभावित होते व आजार वाढतात.

-घोरण्याची कारणे

आपल्या नाकाच्या पाठच्या भागापासून ते पडजिभेच्या मागेपर्यंत एक स्नायूंची नळी असते. ज्याला फॅरिक्स असे म्हणतात. आपला घसा हा त्याचाच एक भाग आहे. ही नळी स्नायूंची (लवचीक) असते. श्वासोच्छवास सुरू असतानाही नळी जेव्हा कंप (व्हायब्रेट) पावते, तेव्हा आवाजाचा उगम होतो, यालाच घोरणे म्हणतात. कुठल्याही कारणाने ही नळी जर अरुंद झाली, तर घोरण्याचा आवाज अधिक वाढतो.

-तर बीपी, मधुमेह होऊ शकतो

घोरणे आणि स्लिप ॲपनिया यामुळे केवळ शेजारी झोपलेल्या व्यक्तीला नव्हे, तर स्वतच्या शरीरात देखील बदल होत असतात. वजन वाढणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर (बीपी) वाढणे, मधुमेह बळावणे यापासून ते हृदयविकार, पॅरालिसिस आणि झोपेत मृत्यूसारख्या भयंकर घटनांशी संबंध आहे.

-घोरण्यासोबतच श्वासात अडथळे धोकादायक 

अलीकडे घोरणाऱ्याची संख्या व त्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. घोरण्यासोबतच श्वासात अडथळे येत असल्यास ‘स्लिप ॲपनिया’चे कारण ठरू शकते. लठ्ठपणा, मान जाड असणारे, रक्तदाब, ताणतणाव, मधुमेही यासारख्या समस्या असणाऱ्या व्यक्तींना हा आजार प्रामुख्याने होतो. यावर उपचार आहे.

-डॉ. राजेश स्वर्णकार, श्वसनरोग तज्ज्ञ

Web Title: Very snoring, take care of your health! There may be sleep apnea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य