महालातील वझलवार वाड्याने अनुभवला ‘त्यांचा’ रियाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 11:22 PM2020-08-17T23:22:38+5:302020-08-17T23:25:03+5:30

महान शास्त्रीय गायक संगीत मार्तण्ड पद्मविभूषण पं. जसराज यांच्या निधनाने जगभरातील शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे नागपूरशीही गुरू-शिष्य परंपरेद्वारे ऋणानुबंध जुळले होते. त्याच नात्याचा अनुबंध म्हणून म्हणा नागपुरातील महाल भागात असलेल्या वझलवार वाड्याच्या अनुषंगाने नागपूरकरांना त्यांच्या रियाजाचा आनंद घेता आला आहे.

Vazalwar Wada in Mahal experienced 'their' practice | महालातील वझलवार वाड्याने अनुभवला ‘त्यांचा’ रियाज

महालातील वझलवार वाड्याने अनुभवला ‘त्यांचा’ रियाज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महान शास्त्रीय गायक संगीत मार्तण्ड पद्मविभूषण पं. जसराज यांच्या निधनाने जगभरातील शास्त्रीय संगीतांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे नागपूरशीही गुरू-शिष्य परंपरेद्वारे ऋणानुबंध जुळले होते. त्याच नात्याचा अनुबंध म्हणून म्हणा नागपुरातील महाल भागात असलेल्या वझलवार वाड्याच्या अनुषंगाने नागपूरकरांना त्यांच्या रियाजाचा आनंद घेता आला आहे.
महालातील शुक्रवारी तलावाच्या काठावर राहत असलेल्या वझलवार घराण्यातील गिरीश वझलवार हे त्यांचे पहिले शिष्य होते आणि पट्टशिष्य म्हणून जसराजांनी त्यांना स्रेह दिला. गिरीश वझलवारही आज हयात नाहीत. मात्र, त्याच नात्याने पं. जसराज जेव्हा केव्हा नागपुरात येत असत, तेव्हा त्यांची व्यवस्था याच वझलवार वाड्यात असायची. वझलवारांचे तेथेच ‘लेक व्ह्यू’ नावाचे लॉज होते. खास जसराज यांच्यासाठी एक स्पेशल खोलीही तयार करण्यात आली होती. मैफिल, नादब्रह्म, सप्तक या संस्थांद्वारे त्यांच्या नागपुरात नेहमी संगीतसभा घेतल्या जात असत. ते नागपुरात आले की याच वाड्यात त्यांच्या रियाजाची मैफिल रंगायची आणि मुख्य कार्यक्रमाआधीच त्यांच्या रचनात्मक स्वरांचा परिचय नागपूरकरांना होत होता. त्यावेळी नागपुरातल्या मैफिलींमध्ये नागपूरचे प्रसिद्ध तबलावादक गोपालराव वाडेगावकर व महेश वझलवार यांनी संगत केली आहे. आज त्यांच्या जाण्याने या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

‘नादब्रह्म’चे उद्घाटन
गिरीश वझलवार यांचे लहान बंधू महेश वझलवार हे तबलावादक होते. ते मुंबईत नोकरीला असताना गिरीश यांच्यामुळे जसराज यांच्याघरी त्यांचे जाणे-येणे असायचे. जसराजही महेश यांच्याकडे येत असत. महेश यांनी नागपुरात ‘नादब्रह्म’ ही संस्था सुरू केली होती. या संस्थेचे उद्घाटन पं. जसराज यांनीच केले होते आणि त्याप्रसंगी नागपुरातील पहिली मैफिल ‘लेक व्ह्यू’ लॉजमध्ये रंगल्याची आठवण महेश वझलवार यांनी सांगितली.

सप्तकने चार मैफिलींचे केले होते आयोजन
शहरातील प्रसिद्ध संगीत संस्था सप्तकनेही पं. जसराज यांच्या चार मैफिलींचे आयोजन केले होते. ११ ते १३ जानेवारी १९८९ रोजी कै. एस.बी. बर्वे संगीत महोत्सव, ११ ते १३ ऑक्टोबर १९९० रोजी दशकपूर्ती समारोह संगीत महोत्सव, ९ ते ११ जानेवारी १९९५ रोजी लॉईड संगीत महोत्सव व ६ ते ७ फेब्रुवारी १९९७ रोजी सप्तक संगीत महोत्सवात पं. जसराज यांना नागपुरात विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. याशिवाय, त्यांच्या अनेक मैफिली नागपुरात रंगल्या आहेत.

Web Title: Vazalwar Wada in Mahal experienced 'their' practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.