३५ वर्षांच्या नृत्यप्रवासातून उलगडले नृत्याचे विविध रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 01:20 AM2019-08-17T01:20:08+5:302019-08-17T01:21:18+5:30

ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरू मदन पांडे आणि ललिता अनंत हरदास यांच्या शिष्या शिकागो येथील इंडियन डान्स स्कूलच्या गौरी जोग आणि कलाश्री आर्ट फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी गेल्या ३५ वर्षात केलेल्या कथ्थक साधनेतून नृत्याचे विविध अंग रसिकांसमोर उलगडले.

Various colors of dance emerged from the 35year dance journey | ३५ वर्षांच्या नृत्यप्रवासातून उलगडले नृत्याचे विविध रंग

३५ वर्षांच्या नृत्यप्रवासातून उलगडले नृत्याचे विविध रंग

Next
ठळक मुद्देगौरी जोग आणि भाग्यलक्ष्मी देशकर यांचे ‘कथ्थक एक नृत्यप्रवास’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरू मदन पांडे आणि ललिता अनंत हरदास यांच्या शिष्या शिकागो येथील इंडियन डान्स स्कूलच्या गौरी जोग आणि कलाश्री आर्ट फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर यांनी गेल्या ३५ वर्षात केलेल्या कथ्थक साधनेतून नृत्याचे विविध अंग रसिकांसमोर उलगडले.
सिव्हिल लाईन्स येथील जवाहर वसतिगृहाशेजारी असलेल्या मणी मेमोरियल ऑडिटोरियममध्ये ‘कथ्थक एक नृत्यप्रवास’ या अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. डॉ. देशकर यांनी ‘कालीस्तुती’ सादर करत कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर जोग व देशकर यांनी नृत्यप्रवासाची कथा विषद करत संस्कृत पंडित स्व. वर्णेकर लिखित रामायण, धृपद, पंचाक्षर, होरी, ठुमरी, ताल-पक्ष यांच्यावर केलेल्या अभ्यासाचीही त्यांनी माहिती दिली. गौरी जोगद्वारा अतिशय समर्थपणे कृष्ण वंदना सादर केली . त्यानंतर मधुराष्टकम, त्रिताल, राग कलावती वरील तराना, त्रिवट, भजन ‘मैली चादर ओढके कैसे द्वार तुम्हारे आऊ’ आदींचे सादरीकरण केले. यावेळी भारतीय सूचना प्रसारण मंत्रालयाचे माजी संचालक डॉ. निलकांत कुलसंगे, डॉ. रवींद्र मोघे, स्व. वसंतराव नाईक मॉरिस कॉलेजच्या संगीत विभाग प्रमुख डॉ. अपर्णा अग्निहोत्री, भवन्सच्या प्राचार्य माडखोलकर उपस्थित होते.

Web Title: Various colors of dance emerged from the 35year dance journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.