नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:50 PM2020-07-02T15:50:02+5:302020-07-02T15:58:26+5:30

कोंढाळी येथून १२ कि.मी. अंतराव घुबडी येथे सेवकराम परतेकी यांच्या शेतातील शेततळ्यात बुडून गुरुवारी दुपारी १ वा. दोन मुलींचा मृत्यू झाला.

Two girls drown in farm in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोंढाळी येथून १२ कि.मी. अंतराव घुबडी येथे सेवकराम परतेकी यांच्या शेतातील शेततळ्यात बुडून गुरुवारी दुपारी १ वा. दोन मुलींचा मृत्यू झाला. भाग्यश्री विजय येडमे (१२) व अर्चिता गोमेश्वर मंगाम (११) अर्चिता ही येथील इंदिरा गर्ल्स विद्यालय येथे सातव्या वर्गात शिकत होती तर भाग्यश्री उमठा येथे सातव्या वर्गात शिकत होती. गुरुवारी सकाळी भाग्यश्री, अर्चिता, दुर्गा प्रकाश राऊत व भाविका मसराम या चार जणी सेवकराम परतेकी यांच्या शेतात खत टाकायला गेल्या. दुपारी १२ वा. जेवणाच्या सुटीनंतर भाग्यश्री व अर्चिता शेततळ्यात पोहण्यासाठी उतरल्या. तेथे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. हे बघून दुर्गा व भाविका यांनी धावत जाऊन सेवकराम यांना घटनेची माहिती दिली. पाण्यात बुडालेल्या या दोघींना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: Two girls drown in farm in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.